Dehu News : दिव्यांग नागरिकांचे उद्या लसीकरण; इतरांचे लसीकरण बंद

Dehu News : दिव्यांग नागरिकांचे उद्या लसीकरण; इतरांचे लसीकरण बंद

देहूगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे मुख्य वैद्यकीय अधिकारी, नेत्रतज्ज्ञ डॉ. किशोर यादव यांची माहिती

Pckhabar- पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील दिव्यांग नागरिकांसाठी लसीकरण मोहीम राबविण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिले आहेत. त्याअंतर्गत देहूगाव परिसरातील 45 वर्षांपुढील सर्व दिव्यांग नागरिकांचे उद्या (सोमवार) लसीकरण करण्यात येणार आहे. त्यामुळे इतर नागरिकांचे लसीकरण उद्या बंद असणार आहे, अशी माहिती देहूगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे मुख्य वैद्यकीय अधिकारी, नेत्रतज्ज्ञ डॉ. किशोर यादव यांनी दिली.

देहूगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात हे लसीकरण होणार आहे.

दिव्यांग नागरिकांचे तातडीने लसीकरण करण्यासंदर्भात केंद्र आणि राज्य सरकारच्या सुचना आल्या आहेत. त्यानुसार पुणे जिल्ह्यातील 45 वर्षांपुढील दिव्यांग नागरिकांसाठी पहिला अथवा दुसरा डोस उद्या ( सोमवार) एकाच दिवशी देण्यात येणार आहे. तसेच 18 ते 45 वयोगटातील दिव्यांग नागरिकांची यादी तयार ठेवण्याचे ही आदेश देण्यात आले आहेत.

याबाबत देहूगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे मुख्य वैद्यकीय अधिकारी, नेत्रतज्ज्ञ डॉ. किशोर यादव म्हणाले ” दिव्यांग नागरिकांना प्राथमिक आरोग्य केंद्राच्या रुग्णवाहिकेच्या माध्यमातून आणून लस दिली जाणार आहे. काही दिव्यांग नागरिकांना अपरिहार्य कारण अथवा वैद्यकीय दृष्ट्या लसीकरण केंद्रावर येण्यास शक्य नसल्यास अशा नागरिकांना त्यांच्या घरी जाऊन लस देण्यात येणार आहे. तसेच देहूगाव, विठ्ठलवाडी, माळवाडी आदी परिसरातील नागरिकांनी आपल्या भागातील दिव्यांग नागरिकांना लसीकरणाची माहिती द्यावी, असे आवाहनही त्यांनी केले”.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *