Dighi Crime News : दुचाकीवरून जाताना बहीण-भावाचा अपघात, बहीणीचा जागीच मृत्यू
Pckhabar- भाऊ बहीणीला दुचाकीवरून रूग्णालयात घेऊन जाताना ट्रकचा धक्का लागून झालेल्या अपघातात बहीणीचा डोक्यावर ट्रकचे चाक गेल्याने जागीच मृत्यू झाला. हा अपघात पुणे-आळंदी रोडवरील तापकीर चौक, चौविसावाडी याठिकाणी शुक्रवारी सकाळी साडे दहाच्या सुमारास झाला.
शिल्पा राजेंद्र वाल्हेकर (वय 49, रा. संगमनेर, अहमदनगर) असे अपघातात मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी त्यांचा भाऊ अजय ओमप्रकाश ससाणे (वय 41, रा. मुळशी, मुळ-थेरगाव, पुणे) यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार ट्रकचालक मनोजकुमार सिताराम भोसले (वय 28, रा. मळनगाव, कवठेमहाकाळ, सांगली) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीमनुसार, अजय हे बहिण शिल्पा यांना दुचाकीवरून शुक्रवारी आळंदी येथील रूग्णालयात घेऊन जात होते. त्यावेळी तापकीर चौक, चौविसावाडी याठिकाणी पाठीमागून आलेल्या ट्रकने (एमएच 14/ ईएम 7116) दुचाकीला डाव्या बाजूने धक्का दिला. त्यामुळे फिर्यादी जमीनीवरती पडले तर, त्यांची बहीण शिल्पा यांच्या डोक्यावरून ट्रकचे चाक गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. अधिक तपास पोलीस दिघी पोलीस करीत आहेत.
Dighi Crime News : दुचाकीवरून जाताना बहीण-भावाचा अपघात, बहीणीचा जागीच मृत्यू










Leave a Reply