Pimpri Corona News : कोरोनाचे 251 नवे रूग्ण, 555 जणांना डिस्चार्ज

Pimpri Corona News : कोरोनाचे 251 नवे रूग्ण, 555 जणांना डिस्चार्ज
Pckhabar- पिंपरी-चिंचवड शहरात कोरोना रूग्ण संख्या चांगलीच कमी झाली आहे. अडीच-ते तीन हजारांच्या आसपास गेलेली रूग्ण संख्या तिनशेच्या आत आली आहे.  तर मृत्यूचा आकडही कमी झाला आहे. त्यामुळे शहरवासियांसाठी मोठी दिलासादायक बाब आहे.  तर शुक्रवारी 251 नवे रूग्ण आढळून आले असून एकाच दिवशी 555 जणांना घरी सोडण्यात आले आहे. 15 जणांचा मृत्यू झाला आहे.

शहरात आत्तापर्यंत 2 लाख 53 हजार 473 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यामध्ये 2 लाख 46 हजार 734 जण कोरोनामुक्त झाले आहेत.  शहरात महापालिका हद्दीत 7 तर हद्दीबाहेरील 8 जणांचा मृत्यू झाला आहे. महापालिका रूग्णालयात 1 हजार 701  रूग्ण उपचार घेत असून 828 रूग्ण गृह विलगीकरणात आहेत.

4 हजार 336 संशयित रूग्ण दाखल करण्यात आले. 992  घरांना भेटी देऊन 3 हजार 653 व्यक्तींचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. शहरात मेजर कन्टेंन्मेंट 91 असून सुक्ष्म कन्टेन्मेंट झोन 650 करण्यात आले आहेत. शहरात 5 लाख 24 हजार 811 जणांचे लसीकरण करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *