Chinchwad News : युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त ‘आदित्य जनसेवा सप्ताह’

Chinchwad News : युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आदित्य जनसेवा सप्ताह

युवा सेना अधिकारी विश्वजित बारणे यांची माहिती
Pckhabar- युवासेनाप्रमुख ,पर्यटन व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त पिंपरी-चिंचवड युवा सेनेच्या वतीने आदित्य जनसेवा सप्ताह आयोजित केला आहे. या अंतर्गत गोरगरिबांना अन्नधान्य वाटप, रिक्षाचालकांना कोरोना सुरक्षा कव्हर वाटप, पवना नदी स्वच्छता मोहीम, वृक्षारोपण, रक्तदान शिबिर घेण्यात येत आहे. 7 तारखेपासून या आदित्य सप्ताहाला सुरुवात झाली असल्याची माहिती युवा सेना अधिकारी विश्वजित बारणे यांनी दिली.

याबाबतची माहिती देताना विश्वजित बारणे म्हणाले, युवासेनाप्रमुख ,पर्यटन व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचा 13 जून रोजी वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने आदित्य जनसेवा सप्ताह आयोजित करण्यात आला आहे. आदित्यसाहेब पर्यावरणमंत्री आहेत. त्यामुळे वृक्षारोपण, पवना नदीची स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. कोरोना काळात अनेक गोरगरीब नागरिकांचे हाल झाले आहेत. या नागरीकांना अन्नधान्य किटचे वाटप करण्यात आले. सुमारे 1 हजार नागरिकांपर्यंत अन्नधान्याची किट पोहोचवले आहे. या माध्यमातून संकटात सापडलेल्या नागरिकांना दिलासा देण्याचे काम युवा सेनेने केले आहे.

विश्वजित बारणे पुढे म्हणाले, गोरगरीब नागरिकांना अन्नधान्य कीट वाटप करून 7 जूनपासून आदित्य जनसेवा सप्ताहाचा शुभारंभ करण्यात आला. सप्ताहाच्या पहिल्या दिवशी मोरेश्वर कॉलनी, थेरगांव येथे अन्न धान्याचे किट वाटप करण्यात आले. याप्रसंगी युवासेना पदाधिकारी अक्षय परदेशी, महेश गेजगे, गणेश थोरात उपस्थित होते.

8 जून रोजी थेरगांव येथे वृक्षारोपण करण्यात आले. या प्रसंगी खासदार श्रीरंग बारणे, नगरसेवक निलेश बारणे, युवासेना पदाधिकारी अक्षय परदेशी, महेश गेजगे, गणेश थोरात, स्वप्निल सुतार, विक्रम झेंडे, प्रशांत नखाते, आदित्य किरवे, अक्षय काकरे, विजय शिंदे, सुरज बारणे, इश्वर कुमावत उपस्थित होते.

9 जून रोजी थेरगांव येथील कन्हैया पार्क, 16 नंबर येथे अन्न धान्याचे किट वाटप करण्यात आले. या प्रसंगी युवासेना पदाधिकारी संदीप येळवंडे, सचिन झरेकर, प्रशांत करडे, करण आहेर, संग्राम पवार, प्रज्वल हवाले, विक्रम झेंडे, आकाश जाधव, आनंद जेऊरकर, महेश गेजगे, उपस्थित होते. 10 जून रोजी दत्तनगर, आदित्य बिर्ला हॉस्पिटल या ठिकाणी गरजूंना अन्नधान्य किट वाटप करण्यात आले. या प्रसंगी चिंचवड विधानसभा युवासेना अधिकारी विश्वजीत बारणे, जेष्ठ समाजिक कार्यकर्ते शंकर बेलगे, युवासेना पदाधिकारी मंदार यळवंदे, विनायक जमदाडे, ओंकार पुजारी, दिपसागर सोनकांबळे, मंगेश देशमाने, मयूर ढिले, अजय गायकवाड,विक्रम झेंडे, प्रशांत नखाते, आदित्य किरवे, अक्षय काकरे, विजय शिंदे, सुरज बारणे, ईश्वर कुमावत उपस्थित होते.

आज 11 जून रोजी पवना नदी स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. पवना नदीपात्रातील गाळ ,जलपर्णी काढण्यात आली. तसेच विसर्जन घाटाची साफसफाई करण्यात आली. या प्रसंगी चिंचवड युवासेना अधिकारी विश्वजीत बारणे, महापालिकेचे कार्यकारी अभियंता पर्यावरण संजय कुलकर्णी ,उद्योजक धनंजय चिंचवडे , युवासेना पदाधिकारी आकाश जाधव,अनिकेत रसाळ,अक्षय काकरे,सौरभ गोरे,अक्षय देवकते उपस्थित होते.

उद्या शनिवारी (दि.12) रिक्षाचालक बांधावाना कोरोना सुरक्षा कव्हर व अन्नधान्य कीट वाटप करण्यात येणार आहे. तर, 13 जून रोजी रक्तदान शिबिर व मोफत अँटीबॉडी तपासणी शिबिर आयोजित केले आहे. थेरगाव येथील गणेशनगर, गणपती मंदिराजवळ हे शिबिर होणार असल्याचे विश्वजीत बारणे यांनी सांगितले. कोरोना काळात रक्ताचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे जास्तीत जास्त नागरिकांनी रक्तदान करावे, असे आवाहनही त्यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *