Talegaon Crime News : मुल होत नसल्याने विवाहितेचा छळ; महिलेची गळफास घेऊन आत्महत्या
Pckhabar-मुल होत नसल्याने पती आणि सासू विवाहितेला वारंवार टोमणे मारत लाथाबुक्यांनी मारहाण करून शारीरिक आणि मानसिक छळ केला. या छळाला कंटाळलेल्या विवाहितेने गळफास घेऊन गुरुवारी आत्महत्या केली. ही घटना तळेगाव दाभाडे स्टेशन परिसरात घडली.
दिपक अशोक चव्हाण, शारदा अशोक चव्हाण (दोघेही रा. बस डेपो समोर, तळेगाव दाभाडे स्टेशन) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. 21 वर्षीय विवाहितेने आत्महत्या केली आहे. याप्रकरणी विवाहितेचे चुलते दत्ता पंढरीनाथ साळुंखे (वय-38, रा. भोसरी) यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत विवाहितेला मुलबाळ होत नसल्या कारणावरून आरोपी दिपक तिला लाथाबुक्यांनी मारहाण करत होता. सासू हिला सोडून दे, दुसरे लग्न लावते, असे म्हणून वारंवार टोमणे मारत होती. या सततच्या छळाला कंटाळलेल्या विवाहितेने गुरूवारी गळफास घेऊन आत्महत्या केली. तळेगाव दाभाडे पोलीस तपास करत आहेत.














Leave a Reply