Maval News : कोरोनाकाळात मृत्यू झालेल्या पालकांच्या पाल्यांना 12वी पर्यंतचे शिक्षण मोफत देणार : आमदार सुनिल शेळके

Maval News : कोरोनाकाळात मृत्यू झालेल्या पालकांच्या पाल्यांना 12वी पर्यंतचे शिक्षण मोफत देणार : आमदार सुनिल शेळके

Pckhabar- ज्या विद्यार्थ्यांच्या आई-वडिलांचा मृत्यू कोरोनाच्या काळात झाला, त्या विद्यार्थ्यांना 12 वी पर्यंत मोफत शिक्षण राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने देण्यात येणार आहे. आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होणार असून कार्यकर्त्यांनी पक्षाची ध्येय, धोरणे व विकास कामे घराघरात पोहचवण्याचे काम करावे, असे प्रतिपादन मावळ विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुनिल शेळके यांनी केले.

येथील शासकीय विश्रामगृहाच्या मंडपात गुरुवारी सकाळी 11 वा. राष्ट्रवादी पक्षाच्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी कोरोना काळात काम करणाऱ्या डॉक्टर, नर्स, आशा सेविका व पत्रकारांचा आमदार शेळके यांच्या हस्ते सन्मानचिन्ह व शाल देवून सत्कार करण्यात आला.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने मावळ तालुक्याच्या जनतेला मोफत औषधोपचार उपलब्ध करुन देण्यासाठी एक रुग्णवाहिका देण्यात आली. या  रुग्णवाहिकेचे या वेळी लोकार्पण करण्यात आले.

याप्रसंगी राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष बबनराव भेगडे, जिल्हा परिषद कृषी व पशुसंवर्धन सभापती बाबुराव वायकर, जिल्हा परिषद सदस्य शोभा कदम, ज्येष्ठ नेते सुभाष जाधव, दिपक हुलावळे, अंकुश आंबेकर, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या उपाध्यक्ष अर्चना घारे, महिला तालुकाध्यक्ष सुवर्णा राऊत, युवक तालुकाध्यक्ष सुनिल दाभाडे, कैलास गायकवाड, सुनिल नाना भोंगाडे, ज्येष्ठ नेते नारायण ठाकर, आशिष खांडगे, अॅड रुपाली दाभाडे, वैशाली दाभाडे, अतुल राऊत, आफताब सय्यद, भाऊ ढोरेसह बहुसंख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *