Talegaon News : भ्रष्टाचाराचे आरोप न करता सत्ता तुमची आहे, सीआयडी चौकशी करा : किशोर आवारे

Talegaon News : भ्रष्टाचाराचे आरोप न करता सत्ता तुमची आहे, सीआयडी चौकशी करा : किशोर आवारे
Pckhabar- तळेगाव दाभाडे नगरपरिषदेतील कारभारावर भ्रष्टाचाराचे आरोप न करता राज्यात सत्ता तुमची आहे. त्यामुळे भुयारी गटार, हिंद माता, रिलायन्स जिओ सह आदी विषयांची सीआयडी किंवा न्यायालयीन चौकशी करा, अशी मागणी जनसेवा विकास समितीचे संस्थापक अध्यक्ष किशोर आवारे यांनी केली.

तसेच मी झेंडा बदलणारा नाही, आज हा लावला, उद्या तो लावला असे काम मी करत नाही, मी स्वतंत्र काम करतो आणि आयुष्यभर स्वतंत्र काम करत राहणार, असेही आवारे म्हणाले.

मंगळवारी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत आवारे बोलत होते. यावेळी बांधकाम समिती सभापती निखिल भगत, कल्पेश भगत, प्रवक्ते मिलिंद अच्युत आदी उपस्थित होते.

किशोर आवारे यांनी तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या विविध विभागात झालेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांवर पुराव्यासह विरोधकांना उत्तरे दिली. तसेच नगरपरिषदेतील कारभारावर भ्रष्टाचाराचे आरोप न करता राज्यात सत्ता तुमची आहे. त्यामुळे भुयारी गटार, हिंद माता, रिलायन्स जिओ सह आदी विषयांची सीआयडी किंवा न्यायालयीन चौकशी करा.

आवारे पुढे म्हणाले, तळेगाव स्टेशन परिसरात विविध शाळा, महाविद्यालय आहेत. या भागात अनेक विद्यार्थ्यांचे अपघात झाले आहेत. त्यामुळे जनसेवा विकास समितीच्या नगरसेवकांनी स्काय वाॅकचा प्रस्ताव मांडला होता. याला कोणी खो घातला हे देखील जनतेसमोर आले पाहिजे. तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचा कारभार नगरसेवकांना अंधारात ठेवून केला जातो. यामध्ये एक जण चाणक्य काम करतो. तो सत्ता कोणाचीही येवो, स्वत: ची भाकरी भाजत असतो. या व्यक्तीचा गाॅडफादर कोण आहे, हे सर्वांना माहिती आहे, असेही आवारे म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *