Dehu News: मंगल परदेशी यांच्या जयंतीनिमित्त भंडारा डोंगर देवस्थानला कडबा कुट्टी मशीन भेट

Dehu News: मंगल परदेशी यांच्या जयंतीनिमित्त भंडारा डोंगर देवस्थानला कडबा कुट्टी मशीन भेट
Pckhabar- श्रीमती मंगलताई प्रतापसिंह परदेशी यांच्या 55 व्या जयंतीनिमित्त तीर्थ क्षेत्र देहूगाव येथील दिलदोस्ती सोशल फाउंडेशनतर्फे भंडारा डोंगर देवस्थानला 20 हजार रुपयांची कडबा कुट्टी मशीन भेट देण्यात आली.

भंडारा डोंगर देवस्थान कमिटीचे ह. भ. प. जोपा पवार यांच्याकडे ही मशीन सुपूर्द करण्यात आली. उद्योजक विशाल परदेशी, राष्ट्रवादी काँग्रेसचे देहूशहर कार्याध्यक्ष मच्छिंद्र चव्हाण, पुणे जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे खजिनदार सागर गायकवाड, राष्ट्रवादीचे नेते सुनील कडुसकर, माजी तंटामुक्ती अध्यक्ष प्रदीप काळोखे, उद्योजक मयूर नाटक, विजय (बापू ) मुसुड्गे, तानाजी काळोखे, निलेश मोरे, किरण (तात्या ) चव्हाण, चंद्रकांत भोसले, शामकांत हिंगे, ज्ञानेश्वर साळुंके, दिलदोस्ती सोशल फाउंडेशन सदस्य उपस्थित होते.

उद्योजक विशाल परदेशी म्हणाले” तीन दिवसांपुर्वी भंडारा डोंगर देवस्थानला दिलदोस्ती फाऊंडेशनतर्फे 25 हजार रुपयांचे गो दान करण्यात आले. या गाईसाठी आईच्या 55 व्या जयंतीनिमित्त 20 हजार रुपयांची कडबा कुट्टी मशीन भेट देण्यात आली आहे.”

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *