Dehu News : शिवस्वराज्य दिनाचा नगरपंचायत प्रशासनाला विसर, भाजपचे आंदोलन
Pckhabar-६ जून रयतेचे राजे अखंड महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा शिवराज्याभिषेक दिन म्हणुन संपुर्ण महाराष्ट्रात साजरा केला जातो. मात्र, देहूगाव नगरपंचायत प्रशासनाला शिवस्वराज्य दिनाचा विसर पडल्याने भाजपच्या वतीने निषेध आंदोलन करण्यात आले.
६ जून रयतेचे राजे अखंड महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा शिवराज्याभिषेक दिन म्हणुन संपुर्ण महाराष्ट्रात साजरा केला जातो. नुकतेच महाराष्ट्र राज्य सरकारने हा दिवस ‘शिवस्वराज दिन’ म्हणुन सर्व सरकारी कार्यालये, ग्रामपंचायत कार्यालय, पंचायत समिती कार्यालय, जिल्हा परिषद कार्यालय, याठिकाणी साजरा करण्यात यावा अशी घोषणा केली. परंतु त्यात नगरपंचायत कार्यालय, नगरपरीषद कार्यालये, नगरपालिका, महानगरपालिका यांचा उल्लेख नाही. त्यामुळे याही ठिकाणी शिवस्वराज दिन साजरा करण्यात यावा आणि तशी महाराष्ट्र शासनाने अधिसुचनेत दुरूस्ती करावी या मागणीसाठी तसेच देहू नगरपंचायत यांनी शिवराज्याभिषेक दिवस असतानाही तो साध्या स्वरूपात देखील साजरा केला नाही, यासाठी देहूगाव नगरपंचायत कार्यालय येथे निषेध नोंदविण्यासाठी आंदोलन करण्यात आले.
संबंधित विषया संदर्भात नगरपंचायत कार्यालय देहूचे अधिकारी श्री केदारी आणि मुख्य कारकून महेश वाळके यांना देहू शहर भारतीय जनता पक्षाच्या वतीने भाजप पुणे जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब काळोखे यांच्या नेतृत्वात आणि शहराध्यक्ष मच्छिंद्र परंडवाल यांच्या वतीने निवेदन देण्यात आले.
याप्रसंगी पंढरपूर देवस्थानचे विश्वस्त शिवाजी बापू मोरे इनामदार, माजी जिल्हा परिषद सदस्य ज्ञानोबा उर्फ माऊली काळोखे, माजी सरपंच कृष्णा शंकर परंडवाल, व्हा. चेअरमन नारायण तात्या पचपिंड, कार्याध्यक्ष प्रकाश मोरे, उपाध्यक्ष सचिन काळोखे, सरचिटणीस सागर मुसूडगे, किसान आघाडी अध्यक्ष रविंद्र काळोखे, ओबीसी अध्यक्ष संदिप परंडवाल, उमेश शिंदे, देहू देवस्थान मा. विश्वस्त विश्वजीत मोरे इनामदार, गणेश परंडवाल, दिपक विधाटे सरचिटणीस भाजप युवा मोर्चा इ. कार्यकर्ते व ग्रामस्त उपस्थित होते.










Leave a Reply