Dehu News: कै. मंगल परदेशी यांच्या स्मरणार्थ गोदान; दर महिन्याला सामाजिक संस्थांच्या मदतीचा संकल्प

Pckhabar- श्रीमती मंगल प्रतापसिंह परदेशी यांच्या स्मरणार्थ तीर्थ क्षेत्र देहूगाव येथील दिलदोस्ती फाऊंडेशनतर्फे भंडारा डोंगर देवस्थानला 25 हजार रुपयांचे गोदान करण्यात आले. तसेच आईच्या स्मरणार्थ प्रत्येक महिन्याच्या दशमीला 25 हजार रुपयांची विविध सामाजिक संस्थांना मदत करण्याचा संकल्प उद्योजक विशाल परदेशी यांनी केला आहे.
भंडारा डोंगर कमिटीचे ह. भ. प. जोपा पवार यांच्याकडे एक गो माता सुपूर्द करण्यात आली. याप्रसंगी कानिफनाथ ट्रस्टचे अध्यक्ष पुंडलिक महाराज गरुड, उद्योजक विशाल परदेशी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे देहू शहराध्यक्ष प्रकाश हगवने, राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश कामगार सेलचे उपाध्यक्ष योगेश जाधव, दिलदोस्ती फाऊंडेशनच्या सदस्यांसह परदेशी कुटुंबातील सदस्य उपस्थित होते.
तसेच उद्या (सोमवार) श्रीमती मंगल प्रतापसिंह परदेशी यांच्या जयंतीनिमित्त भंडार डोंगर देवस्थानला 20 हजार रुपयांची कडबा कुट्टी मशीन देण्यात येणार आहे.
याबाबत उद्योजक विशाल परदेशी म्हणाले” आईच्या स्मरणार्थ विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. या उपक्रमांच्या माध्यमातून आईच्या आठवणी आमच्यासोबत राहतील. सामाजिक बांधिलकी जोपासत आईच्या स्मरणार्थ प्रत्येक महिन्याच्या दशमीला 25 हजार रुपयांची विविध सामाजिक संस्थांना मदत करण्याचा संकल्प केला केला आहे”.










Leave a Reply