Dehu News : विविध सेवाभावी सामाजिक संस्थामार्फत 300 देशी झाडांची लागवड

Dehu News : विविध सेवाभावी सामाजिक संस्थामार्फत 300 देशी झाडांची लागवड
Pckhabar- जागतिक पर्यावरण दिनानिमित्त अभंग प्रतिष्ठान श्रीक्षेत्र देहू, रोटरी क्लब, देहू, स्व.डॉ. प्रा. वैभव सुलाखे मित्र परिवार, वृक्षदायी संस्था, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोशल फाउंडेशन, स्वर्गीय प्रशांतदादा जगताप स्पोर्टस फाउंडेशन, देहू इलेव्हन, कै.सौ.कमलताई नामदेव काळोखे यांच्या स्मरणार्थ बैलगाडा संघटना देहू पंचक्रोशी यांच्या संयुक्त विद्यमाने 300 देशी झाडे लावण्यात आली.

पर्यावरण दिनाच्या निमित्ताने वृक्षारोपणाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले. या वृक्षारोपणाच्या कार्यक्रमातून देहुतील बायपासरोड जवळील संत तुकाराम महाराज क्रीडांगणाच्या सभोवताली 300 देशी झाडे लावण्यात आली. यामध्ये वड,पिंपळ, करंज, बकुळ, कडुनिंब, कदंब, अर्जुन इत्यादी देशी झाडांचा समावेश होता. ही सर्व झाडे दहा फुटांपेक्षा जास्त उंचीची होती. या कार्यक्रम प्रसंगी मावळ तालुक्याचे तहसीलदार, देहू नगरपंचायतीचे मुख्य प्रशासक मधुसूदन बर्गे, वृक्षदाई संस्थेचे अध्यक्ष ह.भ.प. शिवाजीराव मोरे इनामदार, प्राथमिक आरोग्य केंद्राचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ.किशोर यादव, आदी मान्यवर उपस्थित होते.

देहू पंचक्रोशीतील विविध सेवाभावी सामाजिक संस्थेचे सर्व पदाधिकारी व सामाजिक कार्यकर्ते यांनी उपस्थित राहून या वृक्षारोपण कार्यक्रमात महत्त्वपूर्ण सहभाग घेतला. अतिशय आनंदपूर्ण वातावरणात हा वृक्षारोपण कार्यक्रम राबवण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *