Dehuroad Crime News: जनावरांच्या गोठ्यात तरूणीवर बलात्कार, चार जणांना बेड्या
Pckhabar- तरूणीवर सहा जणांनी गेल्या सहा महिन्यांपासून बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी चार आरोपींना देहूरोड पोलिसांनी अटक केली असून दोन अल्पवयीन मुलांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना रावेत आणि मामुर्डी येथे घडली.
नोमान उर्फ आरबाज जावेद खान (वय 19) सुलतान उर्फ मुश्ताक सलीम सय्यद (वय 32), रियाज उर्फ मन्नान जावेद खान (वय 19, सर्व रा. शितळानगर, मामुर्डी) आणि सोहेल शेरअली पिरजादे (वय 21, आंबेडकरनगर, देहूरोड) यांना अटक करण्यात आली आहे. तर, दोन अल्पवयीन मुलांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 20 वर्षीय तरूणीने देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
देहूरोड ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास सोंडे यांनी याबाबत माहिती दिली. जानेवारी 2021 ते 31 मे 2021 या कालावधीत लेखा फार्मरोडवरील स्मशानभूमीसमोर आरोपींच्या मोटारीत आणि शितळानगर-मामुर्डी येथील जनावरांच्या गोठ्यात हा प्रकार घडला. फिर्यादी तरूणी चाकण औद्योगिक परिसरात एका कंपनीत कामाला आहे. फिर्यादी तरूणी आणि आरोपी नोमान खान यांचे प्रेमसंबंध होते. त्यांचा शारीरिक संबंध करतानाचा व्हीडिओ आरोपी सुलतान याने शुट केला आणि तो व्हायरल करण्याची धमकी देत तरूणीवर बलात्कार केला. इतर आरोपींनी देखील संबंधित व्हीडिओ व्हायरल करण्याची धमकी देत वेळोवेळी जबरदस्तीने बलात्कार केला. तसेच, आरोपी नोमान याने तरूणीला मारहाण केली.
कुटूंबियांना जीवे मारण्याची धमकी देत जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. आरोपींवर बलात्कार, अनैसर्गिक अत्याचार, अनुसूचित जाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम (अॅट्रॉसिटी) आणि आयटी अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. देहूरोड पोलीस तपास करत आहेत.










Leave a Reply