Dehu Crime News : जुगार खेळणाऱ्या जुगार चालकासह 12 जणांवर गुन्हा; 82 हजारांचा मुद्देमाल जप्त

Dehu Crime News : जुगार खेळणाऱ्या जुगार चालकासह 12 जणांवर गुन्हा; 82 हजारांचा ऐवज जप्त
Pckhabar- अवैधरित्या जुगार खेळून कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी जुगार चालकासह 12 जणांवर देहूरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार सोमवारी दुपारी तीन वाजता देहूगावातील देविदास हगवणे यांच्या बिल्डिंगवरील टेरेसवर उघडकीस आला.

याप्रकरणी सामाजिक सुरक्षा विभागाचे पोलीस हवालदार संतोष मारूती बर्गे ( वय- 42) यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार जुगार चालक देविदास जयदेव हगवणे (वय ५२), आदिनाथ सदाशिव गायकवाड (वय ४०), उमेश संभाजी कुमार (वय ३८), सचिन गोपाळ हगवणे (वय ४२, सर्व रा.हगवणे आळी, देहूगाव),
संजय सिताराम पचपिंड (वय ५०, रा. गोलांडे आळी, देहुगाव), अफजल सौकत मुलाणी (वय- ३०, रा सुंदर गल्ली, देहूगाव), कृष्णकांत चंद्रकांत मोरे (वय ६५, रा. देहूगाव), संदिप रंगनाथ आढाव (वय- ३५, रा. सुतार आळी, देहुगाव), केशव मारूती पचपिंड ( वय ६२, रा.
सुतार आळी, देहूगाव), तुकाराम शंकर चव्हाण (वय- ४७, रा. महालक्ष्मी आळी. देहुगाव), शाबान हसन शेख (वय-४२ वर्ष रा. हगवणे आळी, देहुगाव), परमेश्वर श्रीराम गाडे (वय-३२, वडाचा माळ, देहूगाव) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

देहूरोड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,
आरोपी जुगार चालक देविदास जयदेव हगवणे याच्या बिल्डिंगवरील पत्र्याच्या रूममध्ये कोरोना नियमांचे उल्लंघन करून आरोपी अवैधरित्या रम्मी जुगार खेळत होते. याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सोमवारी दुपारी छापा टाकून 12 जणांवर गुन्हा दाखल केला. तसेच 82 हजार 780 रूपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.

देहूरोड पोलीस तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *