Dehu News : मोदी सरकारला सात वर्षे झाल्याबद्दल कोरोना योद्धांचा देहू भाजपतर्फे सन्मान
Pckhabar- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारला सात वर्षे पूर्ण झाली, देहू भाजपचे शहराध्यक्ष मच्छिंद्र परंडवाल आणि भाजप नेते सुहास गोलांडे यांच्या अभिष्टचिंतन निमित्ताने भारतीय जनता पक्ष देहू शहराच्या वतीने हॉस्पिटलमध्ये जाऊन सेवा सन्मान करण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे.
यानिमित्ताने देहू प्राथमिक आरोग्य केंद्राचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. किशोर यादव, परिचारिका यांना कोरोना योद्धे म्हणून सन्मानित करण्यात आले. वरद हॉस्पिटलमध्ये डॉक्टर नवनाथ शेळके आणि त्यांच्या संपूर्ण स्टाफचा सन्मान करण्यात आला. मातोश्री हॉस्पिटलच्या डॉ. काळोखे व हॉस्पिटलमधील कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला.
तसेच युनिकेयर हॉस्पिटलमध्ये डॉ. सुहास जोशी आणि संपुर्ण हॉस्पिटल स्टाफचा सन्मान करण्यात आला. याप्रसंगी पुणे जिल्हा भाजप उपाध्यक्ष बाळासाहेब काळोखे, माजी पंचायत समिती सदस्य सुहास गोलांडे, शहराध्यक्ष मच्छिंद्र परंडवाल, मावळ तालुका उपाध्यक्ष संभाजी टिळेकर, व्हाईस चेअरमन नारायण तात्या पचपिंड, कार्याध्यक्ष प्रकाश रायबा मोरे इनामदार, उपाध्यक्ष सचिन काळोखे, ओबीसी सेलचे अध्यक्ष संदीप परंडवाल, कामगार आघाडी अध्यक्ष सत्यवान वाळुंज, युवा नेते विशाल गोलांडे, सरचिटणीस अभय पडोसकर, मनोज ठाणगे, सुयश टिळेकर, भाजपाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.










Leave a Reply