Dehu News : वीज कोसळून 16 मेंढ्या मृत्युमुखी; मेंढपाळ बांधवाला अभंग प्रतिष्ठानचा मदतीचा हात
Pckhabar-30 मे 2021 रोजी सांगुर्डी या ठिकाणी शेतातील धनगर वाड्यातील मेंढरांवर वीज कोसळून 16 मेंढ्या मृत्युमूखी पडल्या तर अनेक मेंढ्या जखमी झाल्या. अशा या संकट काळात अभंग प्रतिष्ठानच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंतीच्या औचित्याने अमृता मारुती करे या धनगर बांधवाच्या परिवाराला सहकार्यासाठी किराणा साहित्य व आर्थिक देणगी देण्यात आली.
याप्रसंगी अभंग प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रविण काळोखे, उपाध्यक्ष सुरेश गाडे, सचिव सलीम मुलाणी, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर फाउंडेशनचे उपाध्यक्ष अॅड.महेश घोडके, सचिन कुंभार, सागर मोरे, शशीकांत गुरव, सचिन काळोखे अजिंक्य साकोरे, सचिन लिंभोरे, राजेंद्र भसे, वसंत भसे, प्रा. विकास कंद उपस्थित होते.
रविवारी देहूगाव सह मावळात मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली होती. यावेळी मोठ्या प्रमाणात विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. सांगुर्डी या ठिकाणी शेतातील धनगर वाड्यातील मेंढरांवर वीज कोसळून 16 मेंढ्या मृत्युमूखी पडल्या तर अनेक मेंढ्या जखमी झाल्या. यामुळे मेंढपाळ अमृता मारुती करे यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. त्यांना अभंग प्रतिष्ठानच्या वतीने किराणा साहित्य आणि आर्थिक मदत केली आहे.










Leave a Reply