Dehu Crime News: किरकोळ कारणावरून पतीने पत्नीचा गळा आवळून केला खून; पती गजाआड
Pckhabar-आईवरून शिवी दिल्याच्या रागातून पतीने पत्नीचा गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना देहूगाव वडाचा मळा येथे गुरुवार उघडकीस आली. याप्रकरणी देहूरोड पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली आहे.
वैभव भगवान लामकाने (वय 24, सध्या रा. नामदेव निवास, वडाचा मळा, देहूगाव. मूळ रा. पिराची कुरोली, पंढरपूर) असे पतीचे नाव आहे. पूजा वैभव लामकाने (वय 19) असे गळा दाबून खून झालेल्या विवाहितेचे नाव आहे. याप्रकरणी पुजाचे वडील सोमनाथ रामदास पाटील (वय-50, रा. देहूगाव) यांनी देहूरोड पोलीस तपास करत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वैभव आणि पूजा यांचे चार महिन्यांपूर्वी (28 जानेवारी) आळंदी येथे विवाह झाला होता. गेल्या काही दिवसांपासून दोघांमध्ये किरकोळ कारणावरून वाद निर्माण होत होते. बुधवारी रात्री दोघांमध्ये भांडण झाले होते. भांडणामध्ये पूजाने आईवरून शिवी दिली. याचा राग मनात धरून वैभवने तिचा गळा दाबून खून केला.
देहूगाव वडाचा मळा येथील नामदेव निवास येथे लामकाने दाम्पत्य दीड महिन्यांपासून भाडेतत्त्वावर राहत होते. गुरूवारी हृदयविकाराचा झटका येऊन पूजा बेशुद्ध झाल्याचा बनाव करीत वैभवने नातेवाइकांना फोन केला. पण, पूजाचे वडील सोमनाथ रामदास पाटील यांना संशय आल्याने पोलिसांना कळविले. वैभवला देहूरोड पोलिसांनी ताब्यात घेऊन चौकशी केली असता पोलिसांना वैभवने उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र, पोलिस खाक्यानंतर त्याने गुन्ह्याची कबुली दिली.
देहूरोड पोलीस तपास करत आहेत.










Leave a Reply