Pimpri news: शहरात ‘या’ 10 ठिकाणी दिवसभर होणार कोरोना चाचणी

Pimpri news: शहरात ‘या’ 10 ठिकाणी दिवसभर होणार कोरोना चाचणी
Pckhabar- पिंपरी-चिंचवड महापालिकेने कोरोना चाचणी केंद्रामध्ये वाढ केली असून शहरातील 10 केंद्रांवर दिवसभर कोरोनाची रॅपिड अँटिजेन चाचणी केली जाणार आहे. सकाळी 8 वाजल्यापासून चाचण्या करण्यास सुरुवात केली जाणार आहे. नागरिकांनी या वेळेत चाचणी केंद्रावर जाऊन तपासणी करून घ्यावी असे आवाहन महापालिका वैद्यकीय विभागाने केले आहे.

संभाजीनगर येथील बीएसएनएलच्या आरटीटीसी सेंटरमध्ये सकाळी 9 ते रात्री 9, तानाजीनगर चिंचवडगावातील तालेरा रुग्णालयात सकाळी 9.30 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत, संत तुकारामनगर येथील यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम)मध्ये सकाळी 8 ते रात्री 8, खराळवाडीतील बालभवन येथे सकाळी 9 ते दुपारी 3.30, पिंपरी कॅम्पातील जुने जिजामाता रुग्णालयात सकाळी 8 ते रात्री 8, पीसीएमटी चौकातील भोसरी रुग्णालयात सकाळी 9 ते दुपारी 3 वाजेपर्यंत, निगडीतील यमुनानगर रुग्णालयात सकाळी 8 ते रात्री 8, म्हेत्रेवस्ती येथील म्हेत्रेवस्ती दवाखान्यात सकाळी 9 ते दुपारी 1, थेरगावमधील खिंवसरा पाटील रुग्णालयात सकाळी 9 ते दुपारी 4 वाजेपर्यंत आणि पिंपळेगुरव काटेपूरम चौकातील बॅडमिंटन हॉलमध्ये सकाळी 9.30 ते दुपारी 4 या वेळेत चाचणी केली जाणार आहे. पूर्वी केंद्राची वेळ सकाळी 10 ते दुपारी 1 अशी होती. त्यामुळे नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असे. दुपारनंतर चाचणी केली जात नसल्याने रुग्णांची गैरसोय होत होती. नागरिकांच्या सोयीसाठी वेळ वाढवण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *