Pimpri Corona news: शहरात आज 655 नवीन रुग्णांची नोंद, 1956 जणांना डिस्चार्ज
Pckhabar- पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागातील 655 नवीन कोरोना बाधित रुग्णांची आज (रविवारी) नोंद झाली. तर 1 हजार 956 जणांना डिस्चार्ज देण्यात आला.
शहरातील 30 आणि महापालिका हद्दीबाहेरील 14 अशा 44 जणांचा आज मृत्यू झाला. आजपर्यंत शहरातील 3 हजार 892 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. शहरातील 2 लाख 46 हजार 709 जणांना आजपर्यंत कोरोनाची लागण झाली आहे. सध्या 6 हजार 469 सक्रिय रुग्ण शहरात आहेत.
शहरात मेजर कंटेन्मेंट झोन 217 आणि मायक्रो कंटेन्मेंट झोन 1 हजार 593 आहेत. आजपर्यंत 4 लाख 77 हजार 389 जणांनी लस घेतली आहे.










Leave a Reply