Pimpri news: पोलीस आयुक्तालयाला 27 दुचाकी, 21 चारचाकी वाहने
Pckhabar- पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाला 27 दुचाकी आणि 21 चारचाकी वाहने उपलब्ध करून देण्यात आली आहेत.
पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांनी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचा पदभार स्वीकारल्यानंतर घेतलेल्या आढाव्यात आयुक्तालयाकडे वाहनांची कमतरता असल्याचे निदर्शनास आले. त्यानुसार त्यांनी जिल्हा नियोजन समितीकडे अनुदानाची मागणी केली होती. त्यानुसार उपमुख्यमंत्री, पालकमंत्री अजित पवार यांच्या अनुदानातून दोन कोटी रुपये वाहन खरेदीसाठी देण्यात आले होते.
पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उप-आयुक्त सुधीर हिरेमठ यांच्या मार्गदर्शनाखाली मोटार परिवहन विभागाचे आबरार सय्यद पोलीस निरीक्षक यांनी पत्र तयार करुन गृहविभागाकडे वाहने खरेदीचा प्रस्ताव पाठविला. त्यानंतर महिंद्रा एक्सयुव्ही कंपनीच्या दोन चारचाकी, महिंद्रा स्कॉर्पिओ एस 5 कंपनीच्या चार चारचाकी, महिंद्रा बोलेरो कंपनीच्या 15 चारचाकी असे एकुण 21 चारचाकी वाहने तसेच, बजाज पल्सर कंपनीच्या 150 सीसी व 128 सीसी इंजिन क्षमता असलेल्या अशा एकुण 27 दुचाकी वाहने खरेदी केली आहे.
खरेदी करण्यात आलेली वाहने पोलीस ठाणे, शाखा, डायल 112 हेल्पलाईनसाठी वाटप करण्यात आले आहेत.










Leave a Reply