Pimpri crime news: धमकी देऊन खंडणी उकाळणार्या पाच जणांवर गुन्हा
Pckhabar-व्यावसायासाठी व्याजाने घेतलेले पैसे व्याजासह परत देऊनही पाच जणांनी तरूणाला वारंवार धमकी देऊन मारहाण करत त्याच्याकडून खंडणी उकळली. हा प्रकार पिंपरी येथे घडला.
विकास किर, सचिन सौदे, विजय सौदे (तिघे रा. काळेवाडी) विक्की भोरे (रा. पिंपरी), खुपचंद मंगताणी उर्फ बुग्गी (रा. वैभवनगर, पिंपरी) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी करण मनोज तुलसानी (वय-20, रा. पिंपरी) याने पिंपरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी करण याने आरोपी विकास किर याच्याकडून व्यवसायासाठी 50 हजार रूपये 20 दिवसांसाठी 25 टक्यांनी घेतले होते. करण हे पैसे 20 दिवसात फेडू शकला नाही. त्यामुळे प्रतिदिन 2 हजार रूपये प्रमाणे 40 दिवसांचे 80 हजार रूपये आरोपींनी घेतले. करणला शगुन चौकात बोलावून घेत पैशांची मागणी करत तुला धंद्दा करू देणार नाही, अशी धमकी देत मारहाण केली. मुद्दल 50 हजार रूपये, व्याज 65 हजार रूपये घेतले. दुकानात घुसून कधी 1 हजार तर कधी 2 हजार रूपये जबरदस्तीने घेवून जात होते. या त्रासाला कंटाळलेल्या तरूणाने पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. पिंपरी पोलीस तपास करत आहेत.
Pimpri crime news: धमकी देऊन खंडणी उकाळणार्या पाच जणांवर गुन्हा










Leave a Reply