Pimpri news: शिवयोद्धा प्रतिष्ठानतर्फे कोविड लसीकरणासाठी मोफत वाहतूक सेवा
Pckhabar-सध्या सार्वजनिक वाहतुक बंद असल्याने नागरिकांना प्रवासासाठी येणारी अडचणी येत आहेत. नागरिकांना लसीकरण करण्यासाठी जाता येत नाही. ही बाब लक्षात घेता शिवयोद्धा प्रतिष्ठानतर्फे तुकाराम विठ्ठल भालेकर यांच्या वाढदिवसानिमित्त रिक्षा सेवेचे रुपीनगर पोलिस चौकीचे पोलिस उपनिरीक्षक संदेश इंगळे, तुकाराम भालेकर आणि शिवयोद्धा प्रतिष्ठाणचे अध्यक्ष अमोल भालेकर यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.
या प्रसंगी पोलिस अधिकारी शिरसाठ, दत्तात्रय ढोले तसेच शिवयोद्धा प्रतिष्ठानचे कार्यकर्ते उपस्थित होते.
राकेश बिराजदार व श्रीकांत भालेकर यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले.
यावेळी शिवयोद्धा प्रतिष्ठान अध्यक्ष
अमोल भालेकर म्हणाले ”बरेच नागरीक वाहतूक सेवा नसल्याकारणाने लसीकरण करण्यास दुर्लक्ष करत होते. प्रभाग क्रमांक 12 मधील नागरिकांचे लसीकरण करुन घेणे ही माझी जबाबदारी आहे.
नागरीकांनी सेवेचा लाभ घेण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क साधावा आणि लसीकरण करुन घ्यावे असे आवाहन करण्यात आले”.
श्रीकांत भालेकर- 9823856264
समाधान हानपुडे- 8411911335










Leave a Reply