Dehu News : श्री संत तुकोबांच्या पालखीचे 1 जुलैला प्रस्थान

 

Dehu News : श्री संत तुकोबांच्या पालखीचे 1 जुलैला प्रस्थान
Pckhabar- जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज यांचा 336 वा आषाढी पायी वारी पालखी सोहळा 1 जुलै रोजी दुपारी 2 वाजता पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे, अशी माहिती संस्थानचे अध्यक्ष नितीन महाराज मोरे यांनी दिली.

अध्यक्ष नितीन महाराज मोरे यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच सभा पार पडली. या सभेत पालखी सोहळा प्रमुख म्हणून अजित महाराज मोरे, संजय महाराज मोरे, भानुदास महाराज मोरे यांची निवड करण्यात आली. या पालखी सोहळाप्रमुखांच्या नियंत्रणात श्री संत तुकाराम महाराज यांच्या 336 व्या पालखी सोहळ्याचे नियोजन केले जाणार आहे. विश्वस्त माणिक महाराज मोरे, विशाल महाराज मोरे, संतोष महाराज मोरे आदी यावेळी उपस्थित होते.

गतवर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वारीची परंपरा खंडीत होऊ नये म्हणून तसेच भाविक आणि वारकर्‍यांच्या मागणीचा विचार करून राज्य सरकारने पालखी सोहळा मोजक्याच लोकांच्या म्हणजे 20 भाविकांच्या उपस्थितीला परवानगी दिली होती.

गेल्या वर्षी असा झाला पालखी सोहळा

आषाढ महिन्याच्या दशमीच्या दिवशी जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीऐवजी केवळ पादुकाच पंढरपूरला बसमध्ये नेण्याची परवानगी राज्य सरकारने दिली होती.

बारशीच्या दिवशी नगरप्रदक्षिणा घालून पालखी परतीच्या मार्गाने देहूत मुक्कामी आली होती.

उर्वरित पालखी सोहळा भजनी मंडपात पार पडला होता. सोहळ्याची सांगता 20 वारकर्‍यांच्या उपस्थितीत झाली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *