Talegaon Crime news: ‘मीच इथला भाई आहे’ म्हणत तरूणाला घरात घुसून मारहाण

Talegaon Crime news: ‘मीच इथला भाई आहे’ म्हणत तरूणाला घरात घुसून मारहाण

Pckhabar- जुन्या वादातून तरूणाच्या घरात घुसून चौघांनी कोयता आणि काठीने जबर मारहाण केली. तसेच तरूणाच्या आईला खाली ढकलून कोयत्याचा धाक दाखवून ‘मीच इथला भाई आहे ‘ असे म्हणत परिसरातील लोकांवर दहशत निर्माण केली. ही घटना बुधवारी रात्री साडेनऊच्या दरम्यान तळेगाव दाभाडे येथील डाळ आळी येथे घडली.

आकाश सरोदे, प्रतिक खोमणे, शुभम आडके, गड्डी आढागळे (सर्व रा. तळेगाव दाभाडे) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी सुमित भगवान शेळके (वय-18, रा. डाळ आळी, तळेगाव दाभाडे) याने तळेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुमित हा बुधवारी रात्री घरी जात होता. त्यावेळी आरोपींनी जुन्या वादातून त्याचा पाठलाग करत घरात घुसून काठीने सुमितच्या डोक्यात मारहाण केली. त्याची आई भांडणे सोडविण्यासाठी मध्ये आल्यानंतर त्यांना आरोपींनी खाली ढकलून दिले. कोयत्याचा धाक दाखवून मीच इथला भाई आहे असे म्हणत परिसरातील नागरिकांमध्ये दहशत निर्माण केली.
तळेगाव दाभाडे पोलीस तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *