Pimpri news: रुग्ण संख्या घटली, 6 हजार 200 बेड शिल्लक : महापालिका आयुक्त राजेश पाटील
Pckhabar- पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोनाच्या रुग्णसंख्येत मोठी घट झाली आहे. त्यामुळे व्हेंटिलेटर, आयसीयू, ऑक्सिजनयुक्त, सीसीसी सेंटरमध्ये असे 6 हजार 200 बेड शिल्लक असल्याची माहिती महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी दिली.
वायसीएमचा एक मजला वगळून वायसीएम रुग्णालये नॉन कोविड रुग्णांवरिल उपचाराकरिता सुरु केली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
पिंपरी-चिंचवड शहरातील दुस-या लाटेत प्रचंड रुग्णसंख्या वाढली. दिवसाला अडीच ते तीन हजाराच्या पटीत नवीन रुग्णांची भर पडत होती. वाढत्या रुग्णसंख्येत गंभीर, अतिगंभीर रुग्णांची भर पडत होती. गंभीर रुग्णांसाठी आवश्यक असलेल्या व्हेटिंलेटर बेडची कमतरता मोठ्या प्रमाणात निर्माण झाली होती. व्हेंटिलेटरचा एकही बेड मिळत नव्हता. नागरिकांना बेडसाठी वणवण फिरावे लागत होते. मात्र, रुग्ण संख्या कमी होत असल्याने शहरात 6 हजार 200 बेड शिल्लक आहेत. तसेच प्रशासन तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर योग्य खबरदारी घेईल, असे आयुक्त पाटील म्हणाले.










Leave a Reply