Dehu news: रोटरी क्लब ऑफ देहूतर्फे मजूर अड्डा, बाजार पेठ, भाजी मंडईत तीन हजार मास्कचे वाटप

Dehu news: रोटरी क्लब ऑफ देहूतर्फे
मजूर अड्डा, बाजार पेठ, भाजी मंडईत तीन हजार मास्कचे वाटप

Pckhabar- रोटरी क्लब ऑफ देहू च्या वतीने देहूगावातील असंघटित मजूर अड्डा भैरवनाथ चौक, देहूगाव बाजार पेठ, संत तुकाराम भाजी मंडई आणि जगद्गुरु भाजीमंडई या ठिकाणी 1000 N95 व 2000 सर्जिकल मास्क यांचे वाटप करण्यात आले.

त्याच बरोबर देहूगावातील युनिकेअर हॉस्पिटल, मातोश्री हॉस्पिटल, वरद हॉस्पिटल, संत तुकाराम मल्टीस्पेशालिटी आणि देऊ मल्टीस्पेशालिटी या कोविड रुग्णांना उपचार देणाऱ्या रुग्णालयास पीपीई किटचे वाटप करण्यात आले. सदर पीपीई किट आर्थिक दृष्ट्या दुर्बल असणाऱ्या घटकांसाठी विनामूल्य वापरण्यात यावे असे रुग्णालयांना आवाहन केले.

या कार्यक्रमास रोटरी क्लब ऑफ देहूचे अध्यक्ष रो. अजित चव्हाण, सचिव प्रा. संदीप भोसले, रो योगेश काळोखे, रो गणेश सावंत, रो राजेंद्र मोरे, रो शांताराम हगवणे, रो दत्तात्रेय कारके, रो सुनील हगवणे, रो बाळासाहेब काळोखे, रो कांतीलाल काळोखे, रो संतोष हगवणे या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *