Dehu News : रोटरी क्लब ऑफ देहूच्या वतीने कोविड सेंटरला दिड लाखांच्या साहित्याची मदत
Pckhabar- देहूगाव येथील कोविड सेंटरला रोटरी क्लब ऑफ देहूच्या वतीने ऑक्सिजन काॅन्सटेटर्स, पल्स ऑक्सिमीटर, थरमल गन, पीपीई किट, ग्लोज आणि मास्क अशा दिड लाख रुपयांच्या वैद्यकीय साहित्याची मदत करण्यात आली.
ही मदत कोविड सेंटरचे प्रमुख डॉ किशोर यादव यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली.
रोटरी क्लब ऑफ देहूचे अध्यक्ष अजित चव्हाण, सचिव प्रा. संदीप भोसले, बाळासाहेब काळोखे, गणेश सावंत, दत्तात्रेय कारके, कांतीलाल काळोखे, योगेश काळोखे, शांताराम हगवणे, राजेंद्र मोरे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
कोविड सेंटरला आवश्यक वैद्यकीय साहित्याची मदत केल्याबद्दल डॉ. यादव यांनी रोटरी क्लब ऑफ देहूच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे आभार मानले.










Leave a Reply