Nigdi News : लायन्स क्लब निगडीच्या वतीने पोलीस स्टेशनला सॅनिटायझर व मास्क भेट
Pckhabar-सध्याच्या कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर आपले पोलीस अधिकारी व कर्मचारी वर्ग कोरोना प्रतिबंध व बंदोबस्त साठी आपले जीव धोक्यात घालून 24 तास सेवा देत आहेत, त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करणे व त्यांना सहकार्य करणे, हे प्रत्येक जागरूक नागरीकाचे कर्तव्य आहे. याच भावनेतून लायन्स क्लब निगडी या स्वयंसेवी संस्थेच्या वतीने निगडी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन पोलीस कर्मचाऱ्यांसाठी मास्क व सॅनिटायझर भेट म्हणून दिले.
याप्रसंगी निगडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश जवादवाडसह अन्य अधिकारी व पोलीस कर्मचारी उपस्थित होते.
निगडी लायन्स क्लब चे अध्यक्ष, मारुती मुसमाडे , लायन्सचे विभागीय अध्यक्ष सुदाम मोरे, समवेत संचालक जयंत मांडे, राजीव कुटे व रामकृष्ण मंत्री उपस्थित होते.
कोरोना प्रतिबंधात्मक काळजी घेत, या कार्यक्रमासाठी, पोलीस कर्मचारी दत्तात्रय रत्नपारखी, किसन शिंदे आणि केशव लोहकरे यांनी सहकार्य केले.










Leave a Reply