डॉक्टर दिनानिमित्त कोरोना योध्यांचा सन्मान

पिंपरी ः लायन्स क्लब ऑफ पुना निगडीच्या वतीने भारतरत्न डॉ बिधानचंद्र रॉय यांच्या जयंतीनिमित्त डॉक्टर दिनाच्या आयोजित कार्यक्रमात कोरोना योध्दा डॉक्टर, परिचारिका, वाहतूक पोलिस, सफाई कर्मचारी, मेडिकल चालक, समाजसेवकांचा ’फ्रंटलाईन कोरोना वारीयर’ म्हणून सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले.
याप्रसंगी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या यमुनानगर रूग्णालयामध्ये मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रकाश ताडे आणि त्यांचे सहकारी डॉक्टर, सेंट्रल गव्हर्मेंट हेल्थ स्किमचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेंद्र मोरे, महापालिकेच्या रूग्णालयामधील परिचारिका, ससून हॉस्पिटलमधील कोवीड पॉझिटिव्ह वार्डात काम करणार्‍या परिचारिका, निगडी वाहतूक पोलिस शाखेच्या महिला पोलिस कर्मचारी, सफाई कर्मचार्‍यांना, मेडिकल चालक कोवीड-19 या महामारीच्या साथीत गोर-गरिबांना भोजन, अन्नधान्य पुरवठा करणार्‍या संस्थांना गौरविण्यात आले. प्रांतपाल लायन अभय शास्त्री यांच्या कल्पनेनुसार हा कार्यक्रम घेण्यात आला.
लायन्स क्लब निगडीचे अध्यक्ष लायन मारुती मुसमाडे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. रिजन चेअरपर्सन लायन सुदाम मोरे आणि झोन चेअरपर्सन लायन दिलीपसिंह मोहिते यांनी मार्गदर्शन केले. लायन मिनांजली मोहिते यांनी आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *