Pimpri Corona News: शहरात आज 161 नवीन रुग्णांची नोंद, 77 जणांना डिस्चार्ज, 1 मृत्यू
Pckhabar- पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागातील 161 नवीन रुग्णांची आज (शनिवारी) नोंद झाली आहे. तर, उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या 77 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
शहरात आजपर्यंत 95 हजार 231 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील 91 हजार 784 जण बरे होऊन घरी गेले आहेत. शहरातील 1734 जणांचा तर शहराबाहेरील परंतू महापालिका रूग्णालयात उपचार घेणार्या 713 अशा 2447 जणांचा आजपर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
सध्या 754 सक्रीय रूग्णांवर पालिका रुग्णालया मध्ये उपचार सुरू आहेत. तर, 1913 जणांचे चाचणी अहवाल प्रतिक्षेत आहेत. शहरातील निगडीतील 62 वर्षीय पुरुष रुग्णाचा आज कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.










Leave a Reply