Maval news : शिवसेना वाढीसाठी महिलांनी विशेष प्रयत्न करावेत : शैलाताई खंडागळे

Maval news : शिवसेना वाढीसाठी महिलांनी विशेष प्रयत्न करावेत : शैलाताई खंडागळे
Pckhabar- मावळातील सुमारे 55 पेक्षा अधिक ग्रामपंचायतीमध्ये निवडणूक होत आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना महिला आघाडीने पक्ष वाढीसाठी विशेष प्रयत्न करावे, असे आवाहन पुणे जिल्हा परिषदेच्या सदस्या आणि महिला संघटिका शैलाताई राजू खंडागळे यांनी केले.

तळेगाव दाभाडे येथे शिवसेना महिला आघाडीची बैठक पार पडली. यावेळी शैलाताई खंडागळे महिलांना मार्गदर्शन करताना बोलत होत्या. याप्रसंगी तळेगाव दाभाडे विभाग प्रमुख भेगडे भाऊ, शिवसेनेच्या महिला उपस्थित होत्या.

यावेळी शैलाताई खंडागळे यांनी महिलांच्या अडचणी जाणून घेत त्या सोडविण्यासाठी प्रयत्न करू, असे आश्वासन त्यांनी महिलांना दिले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *