Talegaon Dabhade news: सत्ताधारी भाजपवर कोरम अभावी सभा तहकूबीची नामुष्की
Pckhabar- तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या ऑनलाइन सर्वसाधारण सभेस सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकांनीच पाठ फिरवल्याने कोरम पूर्ण होऊ शकला नाही. त्यामुळे नगराध्यक्षांना अखेर कोरम अभावी सभा तहकूब करण्याची नामुष्की आली. तर विरोधी पक्षाच्या सदस्यांनी ऑनलाइन सभा तहकुबीच्या निर्णयाचं टाळ्या वाजवून स्वागत केलं.
तळेगाव दाभाडे नगरपरिषदेची ऑनलाईन सर्वसाधारण सभा नगराध्यक्षा चित्रा जगनाडे यांनी आयोजित केली होती. या सभेपुढे एकून सर्व विभागाचे १०७ विषय होते. या सभेस सत्तारुड भारतीय जनता पक्षाचे अवघे ८ सदस्य सहभागी झाले होते. तर सत्तारुड भारतीय जनता पक्षाचे ५ नगरसेवक व जनसेवा विकास समितीचे ७ तर तळेगाव शहर सुधारणा व विकास समितीचे ७ नगरसेवक असे १९ नगरसेवक गैरहजर होते. त्यामुळे नाईलाजाने नगराध्यक्षांना सभा तहकूब करावी लागली.
या ऑनलाईन सर्वसाधारण सभेला भाजपचे सभागृह नेते अमोल शेटे, अरुण भेगडे पाटील, विभावरी दाभाडे,शोभा भेगडे, काजल गटे, संध्या भेगडे, कल्पना भोपळे, प्राची हेंद्रे हे सदस्य उपस्थित होते.तर ऑनलाईन सर्वसाधारण सभा घेऊ नका अशी मागणी जनसेवा विकास समिती, तळेगाव शहर सुधारणा व विकास समिती यांनी लेखी निवेदनाव्दारे केले होती.
हि सभा तहकूब होताच विरोधकांनी जोरदार टाळ्या वाजवून स्वागत केले. यावेळी मुख्याधिकारी कक्षात विरोधी पक्षनेते गणेश काकडे, गटनेते किशोर भेगडे, गणेश खांडगे, उपनगराध्यक्षा वैशाली दाभाडे, अरुण माने, मंगल भेगडे, संगीता शेळके, हेमलता खळदे,यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित होते.










Leave a Reply