Pimpri news: महिला वाहतूक पोलीस कर्मचार्याची लाच स्वीकारण्याची नवी शक्कल
Pckhabar- एका महिला वाहतूक पोलीस कर्मचारी महिलेने कारवाई टाळण्यासाठी लाच घेण्याची नवी शक्कल लढविली आहे. मात्र, लाच स्वीकारण्याची ही नवी पध्दत कॅमेर्यात कैद झाली आहे. एक तरुणी चक्क या महिला वाहतूक पोलीस कर्मचार्याच्या खिशात पैसे ठेवतानाचा व्हिडीओ पिंपरी- चिंचवड शहरात मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
पिंपरी बाजारपेठेतील शगुन चौकातील हा व्हिडिओ असल्याची माहिती मिळाली आहे. या वाहतूक पोलीस कर्मचारी महिलेने कारवाई टाळण्यासाठी एका तरुणीकडून लाच स्वीकारली. एवढेच नव्हे तर लाचेचे पैसे पॅन्टच्या पाठीमागच्या खिशात ठेवण्यास तरुणीला सांगितले. दरम्यान, हा सर्व प्रकार रस्त्याकडेला असलेल्या इमारतीमधील मुलांनी मोबाईलमध्ये चित्रीत केला. सध्या हा व्हिडिओ शहरात चर्चेचा विषय ठरला आहे.
Pimpri news: महिला वाहतूक पोलीस कर्मचार्याची लाच स्वीकारण्याची नवी शक्कल










Leave a Reply