Pimpri news: दिवगंत नगरसेवक दत्ताकाका साने यांच्या मुलाचा राजकारणात श्रीगणेशा

 

Pimpri news: दिवगंत नगरसेवक दत्ताकाका साने यांच्या मुलाचा राजकारणात श्रीगणेशा

राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या शहराध्यक्षपदी यश साने
Pckhabar- पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे दिवगंत नगरसेवक दत्ताकाका साने यांचे चिरंजीव यश साने यांची पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या  शहराध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.

यश साने यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी निवडीचे पत्र दिले आहे.

दत्ताकाका साने  तिसऱ्यांदा मोठ्या मतांनी नगरसेवक म्हणून निवडून आले होते. त्यांनी विरोधी पक्षनेते असताना सत्ताधारी भाजपला जेरीस आणले होते. मात्र, कोरोनामुळे त्यांचे अकाली निधन झाले. त्यांच्यानंतर त्यांचा मुलगा यश साने राजकारण सक्रिय झाला आहे.

बातम्या वाचण्यासाठी खालील फेसबुक लिंकवर क्लिक करून लाईक आणि शेअर करा.
https://www.facebook.com/PC-Khabar-111917450609892/

(ताजे अपडेट मिळविण्यासाठी Bel Icon वर Click करा.)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *