Pimpri news: स्थायी समितीचे सदस्य चक्क सेफ्टी हेल्मेट घालून सभेला उपस्थित
Pckhabar- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीच्या बुधवारी झालेल्या बैठकीत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांनी सेफ्टी हेल्मेट परिधान करून प्रवेश केला. गेल्या आठवड्यातील बैठकीत झालेल्या गोंधळामुळे सदस्यांनी भाजपच्या गटबाजीची खिल्ली उडवली.
स्थायी समितीची बुधवारी बैठक होती.
या बैठकीला शिवसेना सदस्य राहुल कलाटे, पंकज भालेकर, राष्ट्रवादीच्या सदस्या सुलक्षणा शीलवंत-धर, पौर्णिमा सोनवणे यांनी हेल्मेट परिधान करून प्रवेश केला.
गेल्या आठवड्यात झालेल्या बैठकीत चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप समर्थक सदस्यांनी सभागृहातील माईक, प्लेट, फोन यांची मोडतोड केली होती. प्रकार भाजप सदस्यांकडून करण्यात आला होता. त्या पार्श्वभूमीवर शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या सदस्यांनी अशाप्रकारे भाजपच्या कारभाराचा निषेध नोंदवला आहे.










Leave a Reply