Talegaon Dabhade news: नगरपरिषदेची सभा ऑनलाईन घेऊ नका

Talegaon Dabhade news: नगरपरिषदेची सभा ऑनलाईन घेऊ नका
Pckhabar-  तळेगाव दाभाडे नगरपरिषदेची विशेष सर्वसाधारण सभा ‘ऑनलाइन’ न घेता ती नगरपरिषदेच्या सभागृहात घेण्यात यावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते, जनसेवा विकास समिती व तळेगाव शहर विकास समितीच्या वतीने पत्रकार परिषदेत करण्यात आली.
   
तळेगाव शहर विकास सुधारणा समितीचे गटनेते किशोर भेगडे, विरोधी पक्षनेते गणेश काकडे, जनसेवा विकास समितीचे गणेश खांडगे यांनी संयुक्तपणे घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही मागणी केली. याबाबत संबधित वरिष्ठ शासकीय अधिकार्‍यांना नगराध्यक्षांनी ‘ऑनलाइन सर्वसाधारण सभा घेऊ नये म्हणून पत्राव्दारे कळविले आहे.  
 
तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा चित्रा जगनाडे यांनी येथे गुरुवारी 17 डिसेंबर रोजी विशेष सर्वसाधारण सभेचे आयोजन ऑनलाईन केलेले असून त्यावर आक्षेप घेऊन ही सभा सभागृहातच व्हावी अशी आग्रही मागणी काकडे, भेगडे व खांडगे यांनी केली आहे. या अगोदर कोरोना महामारीचा संक्रमणाचा काळ असताना देखील अनेक सभा सभागृहात सुरक्षित अंतर ठेवून पार पडल्या आहेत.
         17 तारखेच्या सभेत एकूण 107 विषयांचा समावेश आहे. त्यातील सर्वच विषय जनहिताचे असल्याने त्यावर सभागृहात खुली चर्चा होणे गरजेचे आहे असे भेगडे यांनी यावेळी सांगितले. त्यासाठी ही सभा ऑनलाइन’ न घेता ती नगरपरिषदेच्या सभागृहात घेण्यात यावी. अशी मागणी परिषदेत करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *