Dehu news: डॉ. किशोर यादव, मंगेश तापकीर यांचा कोविड योद्धा पुरस्काराने सन्मान

 

Dehu news: डॉ. किशोर यादव, मंगेश तापकीर यांचा कोविड योद्धा पुरस्काराने सन्मान

Pckhabar- कोरोना कालावधीत कोरोना रुग्णसेवेत तत्पर आणि अहोरात्र मेहनत घेणाऱ्या देहूगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे मुख्य वैद्यकीय अधिकारी तथा नेत्रतज्ज्ञ डॉ. किशोर यादव आणि पॅथॉलॉजिस्ट मंगेश तापकीर यांचा अबिसारा बहुउद्देशीय समाजसेवा संस्थेतर्फे कोविड योद्धा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.

प्राथमिक आरोग्य केंद्रातील मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ.किशोर यादव यांनी कोरोना काळात प्लाझ्मा डोनर्सचा व्हाट्सअँपवर ग्रुप तयार केला. या ग्रुपच्या माध्यमातून अनेक गरजवंतांना प्लाझ्मा डोनर्स बरोबर कनेक्ट करून दिले. तसेच स्वतःही रुग्णसेवेत तत्पर राहिले. तसेच देहूगाव व परिसरात रूग्ण संख्या कमी करण्यासाठी वेळोवेळी नागरिकांमध्ये जनजागृती केली.

पॅथॉलॉजिस्ट मंगेश तापकीर यांनी देखील प्लाझ्मा दान केला. याबद्दल डॉ. यादव आणि तापकीर यांचा पुण्यातील अबिसारा बहुउद्देशीय समाजसेवा संस्थेतर्फे कोविड योद्धा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.

तसेच औंध जिल्हा रुग्णालयाच्या वतीने देहूगाव येथील ५० महिलांची निरामई तंत्रज्ञानाद्वारे स्तनकर्करोग तपासणी करण्यात आली.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *