Pimpri news: आगामी महापालिका निवडणुकीत सत्ताबदल अटळ : खासदार बारणे

Pimpri news: आगामी महापालिका निवडणुकीत सत्ताबदल अटळ : खासदार बारणे
Pckhabar- महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीत सत्ताबदल हा अटळ आहे. शिवसेनेच्या प्रत्येक इच्छुक उमेदवाराला पक्षाकडून आवश्यक ती मदत केली जाईल. मात्र उमेदवारांनी घरोघरी जाऊन, जनहिताची कामे करून शिवसेनेचा धनुष्यबाण प्रत्येक शहरवासियाच्या मनामनात रुजवावा. आपला उमेदवार म्हणजे ’धनुष्यबाण’ अशा पद्धतीचे काम करून महानगरपालिका निवडणुकीतील सत्ताबदलाचे शिलेदार व्हा, असा सल्ला मावळ लोकसभेचे खासदार श्रीरंग बारणे यांनी पिंपरी-चिंचवड मधील शिवसैनिकांना दिला.

आगामी पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे ’महापालिका निवडणूक मिशन 2022’ हे अभियान सुरु झाले आहे. या अभियानांतर्गत पिंपरी-चिंचवड विधानसभा क्षेत्रामध्ये प्रभागनिहाय बैठका सुरु झाल्या आहेत. महानगरपालिका निवडणूकीची पूर्व तयारी कशा पद्धतीने करायची. मतदार नोंदणी अभियान, शिवसेना सभासद नोंदणी याबाबत प्रमुख पदाधिकार्‍यांनी गटप्रमुख, शाखाप्रमुख, विभागप्रमुख यांच्याशी संवाद साधला. त्यावेळी खासदार श्रीरंग बारणे बोलत होते.
यावेळी शिवसेना पुणे जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे, उपजिल्हाप्रमुख बाळासाहेब वाल्हेकर, शहरप्रमुख योगेश बाबर, शहरसंघटिका उर्मिला काळभोर, चिंचवड विधानसभा संघटिका अनिता तुतारे, सरीता साने, उपशहरप्रमुख, विभागप्रमुख, शाखाप्रमुख, गटप्रमुख व अंगीकृत संघटनाचे शिवसैनिक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *