Sangvi news: महेश मंडळातर्फे आयोजित रक्तदान शिबीराला उत्स्फूर्त प्रतिसाद
Pckhabar- सांगवीतील महेश मंडळातर्फे कै.चंपालालजी गुगळे यांच्या स्मरणार्थ आयोजित केलेल्या २२ व्या रक्तदान शिबिरात 152 जणांनी रक्तदान केले.
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेच्या नगरसेविका शारदा सोनवणे यांनी स्वतः रक्तदान करून शिबिराचे उद्घाटन केले. यावेळी संदीप गुगळे, पुणे जिल्हा माहेश्वरी प्रगती मंडळाचे युवा अध्यक्ष कृष्णा राठी, सतीश लोहिया, अभय जाजू , अभय करवा आदी उपस्थित होते.

सद्यस्थितीत शहरात रक्तपेढ्यामध्ये असलेली रक्ताची टंचाई व कोरोनामुळे रक्त संकलन करण्यात येणाऱ्या अडचणीच्या पार्श्वभूमीवर या रक्तदान शिबिरात १५२ रक्तदात्यानी रक्तदानाचे पवित्र कार्य केले. रक्तसंकलनसाठी के इ एम हॉस्पिटलच्या रक्तपेढ़ीने सहकार्य केले.
शिबिराच्या यशस्वीतेसाठी निलेश अटल , विवेक झंवर , भूषण हरकुट, पंकज टावरी , मनोज अटल , गजानंद बिहाणी, तुषार माहेश्वरी, सचिन मंत्री यांनी सहकार्य केले.










Leave a Reply