Dehu news: देहूत उद्या मोफत स्तनांच्या कर्करोग तपासणी शिबिर
Pckhabar- प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने उद्या (मंगळवार) मोफत स्तनांच्या कर्करोगाची तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
या शिबिराचा देहू आणि पंचक्रोशीतील सर्व माता भगिनींनी लाभ घ्यावा, असे आवाहन देहू प्राथमिक आरोग्य केंद्राचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. किशोर यादव यांनी केले आहे.
हे शिबिर प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये सकाळी 10 ते दुपारी 1 कालावधीत होणार आहे.
याबाबत माहिती देताना डॉ. यादव म्हणाले, ‘स्तन कर्करोगाची तपासणी अत्यंत गोपनिय, वेदनाविरहित आणि सुरक्षित आहे. महिलांनी न लाजता स्तन कर्करोगाची तपासणी करून घ्यावी. जेणेकरून काही समस्या असतील तर वेळीच उपचार केल्यास स्तन कर्करोगावर मात करता येईल.’










Leave a Reply