Nigdi news: भक्ती शक्ती चौकातील पुल वाहतूकीसाठी खुला

 

Nigdi news: भक्ती शक्ती चौकातील पुल वाहतूकीसाठी खुला
Pckhabar- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने भक्ती शक्ती चौक, निगडी येथील पुणे-मुंबईकडे व मुंबई-पुणेकडे जाणा-या महामार्गावरील नव्याने बांधण्यात आलेल्या उड्डाण पुलाचे उद्घाटन आज महापौर उषा ऊर्फ माई ढोरे यांच्या हस्ते आणि भोसरी विधानसभेचे आमदार महेश लांडगे यांच्या उपस्थितीत संपन्न झाले. 

या कार्यक्रमास उपमहापौर केशव घोळवे, सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके, स्थायी समिती सभापती संतोष लोंढे, कला, क्रिडा, साहित्य व सांस्कृतिक समिती सभापती उत्तम केंदळे, मनसे गटनेते सचिन चिखले, अपक्ष आघाडीचे गटनेते कैलास बारणे, अ प्रभाग अध्यक्षा शर्मिला बाबर, ब प्रभाग अध्यक्ष सुरेश भोईर, नगरसदस्या सीमा सावळे, आशा धायगुडे- शेंडगे, शैलजा मोरे, कमल घोलप, सुमन पवळे, नगरसदस्य अमित गावडे आदी उपस्थित होते.

मुंबईहून पुण्याकडे येताना शहराचे प्रवेशद्वार म्हणून भक्ती-शक्ती समुह शिल्प उद्यान चौकाची ओळख आहे. या चौकात चारही बाजूने शहरातील तसेच, बाहेरील  अवजड वाहने सातत्याने ये-जा करतात. त्यामुळे वाहतूक सुरळीत व अधिक सुरक्षित होण्यासाठी पालिकेने चौकात उड्डाणपुल, ग्रेडसेपरेटर, रोटरी रस्ता बांधण्याचे  काम बी. जी. शिर्के कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजी कंपनीला दिले.  27  जून 2017 रोजी कंपनीने कामाला  सुरुवात केली. या कामासाठी सुमारे 150  कोटी रूपये खर्च अपेक्षित आहे. कामाची निर्धारित मुदत 26 डिसेंबर 2019 रोजी संपली आहे. त्यामुळे या कामाला मुदतवाढ देण्यात आली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *