Dehu news: देहू नगर पंचायत जाहीर; शहर राष्ट्रवादीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे मानले आभार
Pckhabar- उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये आज देहू नगर पंचायतची घोषणा करण्यात आली. गेल्या अनेक वर्षांपासूनची मागणी मान्य झाल्याने मावळचे आमदार सुनिल शेळके, देहू शहर राष्ट्रवादी काँग्रेस आणि देहू देवस्थानच्या वतीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आभार मानले.
गेली कित्येक दिवस प्रतिक्षेत असलेली पुणे जिल्ह्यातील राजकीय वर्तुळातील महत्वाची मानली जाणारी हि ग्रामपंचायत महापालिका मधे जाणार की नगर पंचायत होणार या चर्चेला उधाण आले होते. पण राज्यात महाविकास आघाडी सरकार आले आणि मावळ विधानसभा मतदार संघाचे आमदार सुनिल शेळके यांच्या प्रयत्नांनी व मधुकर महाराज मोरे, अभिमन्यू काळोखे, प्रकाश हगवणे, कांतीलाल काळोखे, माणिक महाराज मोरे, रत्नमाला करंडे, मधुकर कंद, व संत तुकाराम महाराज देवस्थान विश्वस्त आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या उपस्थित आज अजितदादा पवार यांनी या बाबतची अधिकृत घोषणा केली.
नगर पंचायत होणे हे वाढत्या लोकसंख्येच्या दृष्टीने आणि जगाच्या पटलावर असणाऱ्या तीर्तक्षेत्र देहू या नगरीच्या विकासाकडे वाटचाल करण्याच्या दृष्टिकोनातून नगर पंचायत होणे काळाची गरज होती.
बातम्या वाचण्यासाठी खालील फेसबुक लिंकवर क्लिक करून लाईक आणि शेअर करा.
https://www.facebook.com/PC-Khabar-111917450609892/
(ताजे अपडेट मिळविण्यासाठी Bel Icon वर Click करा.)










Leave a Reply