Sangvi news: मनसे चित्रपट सेनेच्या वतीने जेष्ठ अभिनेते रवी पटवर्धन यांना श्रध्दांजली
Pckhabar- मनसे चित्रपट सेनेचे वतीने जेष्ठ अभिनेते रंगकर्मी रवी पटवर्धन यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन त्यांच्या अभिनयांच्या आठवणीनां उजाळा देत श्रध्दांजली वाहण्यात आली.
स्व. निळू फुले नाटगृहामध्ये झालेल्या कार्यक्रमाला मनसे चित्रपट सेनेचे शहराध्यक्ष दत्ता घुले, शहर उपाध्यक्ष राजू सावळे, प्रदिप गायकवाड , सुरेश सकट, अमोल भुजबळ , किशोर गुरव , रोहन पवार आदी उपस्थित होते.
पटवर्धन यांनी वयाच्या ८४ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. मराठी, हिंदी चित्रपटसृष्टी, नाटक, दूरदर्शन यात विविधांगी अदाकारीने त्यांनी आपला वेगळा ठसा उमटविला होता. अलीकडेच “अगं बाई सासूबाई” या मालिकेमधील त्यांचे ‘दत्ताजी आजोबा’ हे पात्र खूप लोकप्रिय झाले होते.
बातम्या वाचण्यासाठी खालील फेसबुक लिंकवर क्लिक करून लाईक आणि शेअर करा.
https://www.facebook.com/PC-Khabar-111917450609892/
(ताजे अपडेट मिळविण्यासाठी Bel Icon वर Click करा.)










Leave a Reply