news: आळंदीत उद्यापासून संचारबंदी
Pckhabar-तीर्थक्षेत्र पंढरपूर येथील कार्तिकी यात्रेच्या धर्तीवर आळंदीतील कार्तिकी यात्रा नियोजन करण्यात आल्याने आळंदीत 6 ते 14 डिसेंबर या काळात कोरोंना पार्श्वभूमीवर आळंदी पंचक्रोशीत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. ही संचारबंदी आळंदी पंचक्रोशीतील 12 गावांत असणार आहे, अशी माहिती पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी दिली आहे.
यावर्षीची यात्रा आळंदीत भाविकां विना होणार असून संचार बंदी काळात अत्यावश्यक सेवा वगळून इतर आस्थापणा बंद राहणार असल्याने व्यापारी नागरिकांमध्ये मात्र नाराजी आहे. संचारबंदीचे काळात भाविक, नागरिक, वारकरी यांनी सहकारी करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
या वर्षीचे यात्रेवर कोरोनाचे सावट असल्याने कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाटी यावर्षी आळंदी मंदिरातील धार्मिक कार्यक्रम मोजक्याचा भाविकांचे उपस्थितीत करण्यास राज्य शासनाने परवानगी दिली आहे. यासाठी काही वारकर्यांची उपस्थिती तसेच त्यासाठी प्रशासनाने अटी आणि शर्ती घालून दिल्या आहेत. बंधनात तसेच संचारबंदीचे सावटात आळंदी कार्तिकी यात्रा होणार आहे. यासाठी शासकीय अधिकारी, लोकप्रतिनिधी यांची बैठक देखील आळंदी मंदिरात झाली.
आळंदी कार्तिकी यात्रेस परंपरेने येणार्या दिंड्यांतील पंढरपूर येथून तीन दिंड्यांतील प्रत्येकी वीस वारकर्यांना प्रवेश देण्यात येणार आहे. आळंदीसह पंचक्रोशीतील 12 गावात संचारबंदी आदेश असल्याने धर्मशाळेत वारकर्र्यांना आणि भाविक भक्तांना राहण्यास प्रतिबंध घालण्यात आला आहे. इंद्रायणी नदीचे परिसरात संचारबंदी व कालावधीत भाविकांना स्नान करण्यास बंदी घातली आहे.
संत ज्ञानेश्वर महाराज मंदिराच्या बाहेर इतर ठिकाणी धार्मिक कार्यक्रम करण्यास बंदी असून माऊली मंदिरात पास शिवाय प्रवेश देण्यात येणार नाही. मंदिरातील धार्मिक कार्यक्रम मोजक्याच मान्यवर भाविकांच्या उपस्थितीत होणार आहेत. कार्तिकी यात्रा कालावधीत संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधीचे स्पर्श दर्शन कोणालाही करता येणार नाही, मंदिरात प्रवेश करताना मास्कचा वापर, सॅनिटायझर व सोशल डिस्टंसिंगचे पालन करण्याचे बंधन राहणार आहे. कार्तिकी काळात श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमेटी वतीने परंपरेचे कार्यक्रम सोशल मीडिया, युट्युब, फेसबुक लाईव्ह च्या माध्यमातून सर्वत्र प्रसारित करण्यास आदेशीत करण्यात आले आहे. भाविकांना ऑनलाईन दर्शन मिळेल यासाठी उपाययोजना करण्याचे संस्थानला पुणे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र देशमुख यांचे सुधारित आदेशाने बजाविण्यात आले आहे. या वर्षीची कार्तिकी यात्रा भाविक, वारकरी यांच्याशिवाय होणार असल्याने व्यापारी नागरिकांत नाराजी आहे. स्थानिक व्यवहार सुरळीत सुरू ठेवण्याची गरज असल्याचे व्यापारी नागरिकांतून सांगितले जाते.











Leave a Reply