Pimpri bjp News: भाजपच्या ‘या’ 27 नगरसेवक चार वर्षात एकही पद नाही

Pimpri bjp News: भाजपच्या ‘या’ 27 नगरसेवक चार वर्षात एकही पद नाही

निवडणुकीच्या तोंडावर स्फोट होण्याची शक्यता
Pckhabar-पिंपरी-चिंचवड महापालिकेतील भाजपच्या सत्तेला चार वर्षे पूर्ण झाली असून चार वर्षात तब्बल 27 नगरसेवकांना एकही पद मिळाले नाही. त्यामुळे या नगरसेवकांमध्ये नाराजी, अस्वस्थता दिसून येत आहे.निवडणुकीच्या तोंडावर स्फोट होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या 2017 मध्ये झालेल्या निवडणुकीत भाजपची निविर्विदा सत्ता आली. भाजपचे तब्बल 76 नगरसेवक निवडून आले. पाच अपक्षांनीही पाठिंबा दिला. त्यामुळे पाशवी बहुमतासह पालिकेवर पहिल्यांदाच कमळ फुलले. आमदार लक्ष्मण जगताप आणि महेश लांडगे शहराचे कारभारी झाले.

पालिकेतील कोणतेही पद विरोधकांना मिळणार नाही याची तजवीज केली. त्यादृष्टीने प्रभाग रचनाही केली. त्यानुसार सर्वच प्रभाग भाजपच्या हाती ठेवले. पक्षाने पाच वर्षात सर्व नगरसेवकांना एक पद देण्याचे धोरण ठरविले होते. परंतु, चार वर्षात तब्बल 27 नगरसेवकपदाविना आहेत.

‘हे’ 27 नगरसेवक आहेत पदाविना!

जयश्री गावडे, शीतल शिंदे, शत्रुघ्न काटे, नितीन लांडगे, चंद्रकांत नखाते, संगीता भोंडवे, माया बारणे, आशा शेंडगे, सुजाता पालांडे, आरती चोंधे, पालिकेत भाजपचे खाते उघडणारे आणि बिनविरोध निवडून आलेले रवी लांडगे, पहिल्यावेळी निवडून आलेले संदीप वाघेरे, तुषार कामठे, बाळासाहेब ओव्हाळ, वसंत बोराटे, शैलेश मोरे, प्रियंका बारसे, हिराबाई घुले, निर्मला गायकवाड, सविता खुळे, माधवी राजापूरे, सारिका बो-हाडे, सारिका लांडगे, कोमल मेवाणी, संदीप कस्पटे, राजेंद्र गावडे, संतोष कांबळे यांना विषय समितीचे सभापतीपद आणि प्रभाग अध्यक्ष यापैकी एकही महत्वाचे पद मिळाले नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *