Bhosari news: ‘संमिश्र शिक्षणव्यवस्था ही काळाची गरज’ ; शिव व्याख्याते प्रा. प्रदीप कदम
Pckhabar- समिश्र शिक्षण पध्दती ही काळाची गरज असून चिंता- चिंतन व्यथा – व्यवस्था आणि दशा- दिशा ही पारंपारिक व्यवस्था बदलण्याचे काम ऑनलाईन शिक्षण पध्दती करीत आहे. गुरूकुल शिक्षण व्यवस्थेपासून सुरू झालेली शिक्षण व्यवस्था आधुनिक विज्ञान तंत्रज्ञानाने मानवी जीवनाचा सर्वांगीण विकास या शिक्षण पध्दतीने सुरू केला असे आपल्याला म्हणता येर्इल, असे प्रतिपादन शिव व्याख्याते व काँनक्वेस्ट कॉलेजचे प्राचार्य प्रा. प्रदीप कदम यांनी केले.
इंद्रायणीनगर भोसरी येथील भगवान महावीर एज्यकेशन सोसायटीच्या प्रितम प्रकाश महाविद्यालयामध्ये दि 01 व 02 डिसेंबर 2020 रोजी चौथी प्रकाश व्याख्यानमाला महाविद्यालयामध्ये नुकतीच पार पडली. या व्याख्यानमालेचे प्रथम पुष्प गुंफतांना प्रा. कदम बोलत होते.
या व्याख्यानमालेचे उद्घाटन दि 01 डिसेंबर 2020 रोजी जेष्ठ कवी प्रा. चंद्रकांत वानखेडे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी उपस्थित शिव व्याख्याते व काँनक्वेस्ट कॉलेजचे प्राचार्य प्रा. प्रदीप कदम , मा. अध्यक्षा श्री ऑल इंडिया जैन कॉन्फरन्स महिला शाखा नवी दिल्ली रूचिरा सुराणा, संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा. प्रा. डॉ. अशोककुमार पगारिया, उपाध्यक्ष मा. विलासकुमार पगारिया, महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. सदाशिव कांबळे, मुख्य संयोजक प्रा.पांडुरंग भास्कर, प्रा. डॉ. विजय निकम व प्रा. प्रशांत रोकडे उपस्थित होते.
प्रा. चंद्रकांत वानखेडे यांनी आपल्या उद्घाटनपर भाषणात बदलत्या संस्कॄतीचे चित्र आपल्या काव्यातून व्यक्त करून बदलत्या भाव विश्वाचे सामाजिक चित्रण व्यक्त केले.
प्रमख अतिथी रूचिरा सुराणा यांनी व्याख्यानमालेस शुभेच्छा देताना शिक्षण व्यवस्थेचे शिवधनुष्य पगारिया सर यांनी पेलले उत्तरोतर या महाविद्यालयाची प्रगती होवो अशी भावना व्यक्त केली.
आपल्या प्रास्ताविक मनोगतातून डॉ. अशोककुमार पगारिया यांनी आपले बंधूप्रेमाबदलचा ओलावा व्यक्तकरून आजतागायत विविध उपक्रमानी मी माझ्या बंधूचे स्मरण जिवंत ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. 36 वर्ष स्वर्गीय प्रा. प्रकाश पगारिया स्मॄती प्रित्यर्थ रक्तदान शिबीराचे आयोजन पाश्र्वनाथ युवक मंडळाच्या वतीने केले जात आहे. आज सुध्दा रक्तदान शिबीराचे आयोजन करून विद्यार्थीपयोगी व समाजपयोगी कार्यक्रम राबविणे ही खरी श्रध्दांजली प्रा. प्रकाश पगारिया यांना ठरेल अशी भावना व्यक्त केली.
दि. 02 डिसेंबर रोजी व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प मा. प्रा. डॉ. अशोक थोरात यांनी ऑनलाईन माध्यमातून गुंफताना आपल्या मनोगतात त्यांनी नव्या शैक्षणिक धोरणाचा आढावा घेताना सर्वांगीण विकास हेच नव्या शेक्षणिक धोरणाचे मध्यवर्ती सुत्र असून आवडीनुसार व व्यक्तीच्या क्षमतेनुसार नव्या शैक्षणिक धोरणात सर्वांना शिक्षण घेता येणार आहे. नवे शैक्षणिक धोरण हे पाच सूत्रांवर आधारीत असून त्यामध्ये स्वदेशी धोरण, विभाजन प्रक्रियेविरोधी सुड, संशोधनाला प्राधान्य, संलग्नीकरण व कौशल्य गुणवत्ता या पंचसूत्रीवर आधारीत असून परंपरा आणि आधुनिक काळाची गरज परस्थितीनुरूप मांडण्याचा प्रयत्न नव्या शैक्षणिक धोरण मांडणाऱ्या विचारवंतानी केलेला आहे. हेच नव्या शैक्षणिक धोरणाचे यश आहे.
आपल्या अध्यक्षीय मनोगतात मा. प्रकाश कटारिया यांनी कालानुरूप शिक्षणव्यवस्थेत होत असलेल्या बदलाचा स्विकार करून नवी आव्हाने पेलण्याची क्षमता विद्यार्थी वर्गामध्ये निर्माण व्हावी अश्या शुभेच्छा व्यक्त केल्या.
प्रा. विभा ब्राम्हणकर यांनी सूत्रसंचालन केले व प्राचार्य सदाशिव कांबळे यांनी आभार मानले.
सदर व्याख्यानमाला यशस्वी होण्यासाठी मुख्य संयोजक प्रा. पांडुरंग भास्कर व सहसमन्वयक प्रा. डॉ. विजय निकम, प्रा. प्रशांत रोकडे, प्रा. उमेश लांडगे, प्रा. डॉ. स्वाती वाघ, प्रा. सुधाकर बैसाने, प्रा. महालक्ष्मी ठुबे, प्रा. सचिन पवार, प्रा. रूपाली आगळे व महाविद्यालयातील शिक्षकेत्तर कर्मचारी सारिका बेलदोर यांनी सहकार्य केले.
बातम्या वाचण्यासाठी खालील फेसबुक लिंकवर क्लिक करून लाईक आणि शेअर करा.
https://www.facebook.com/PC-Khabar-111917450609892/
(ताजे अपडेट मिळविण्यासाठी Bel Icon वर Click करा.)










Leave a Reply