Pune news: पुणे पदवीधर मतदारसंघात महाविकास आघाडीचे अरुण लाड यांचा दणदणीत  विजय; भाजपाचा बालेकिल्ला उद्धवस्त

 

Pune news: पुणे पदवीधर मतदारसंघात महाविकास आघाडीचे अरुण लाड यांचा दणदणीत  विजय; भाजपाचा बालेकिल्ला उद्धवस्त
Pckhabar-: विधानपरिषद निवडणुकीच्या पुणे पदवीधर मतदारसंघात महाविकास आघाडीचे अरुण लाड यांचा दणदणीत विजय झाला आहे.  48 हजार 824 मतांनी लाड  विजयी झाले आहेत. मतमोजणी केंद्राबाहेर त्यांच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष सुरु केला आहे.

अंतिम निकाल येण्यापूर्वीच लाड यांच्या कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत जोरदार घोषणाबाजी सुरु केली आहे. आतापर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार अरुण लाड यांना एक लाख 22 हजार 1450 मतं मिळाली आहेत. तर भाजपच्या संग्रामसिंह देशमुख  यांना 72 हजार 321 मतं मिळाली आहेत. लाड यांना तब्बल 49 हजार मतांची आघाडी मिळाल्याने त्यांचा विजय झाला आहे. त्यामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष सुरु केला आहे, अद्याप निकालाची अधिकृत घोषणा बाकी आहे.

पुणे पदवीधर फायनल निकाल*

महाविकास आघाडीचे अरुण लाड यांना 1 लाख 22 हजार 145 मते मिळाली

संग्राम देशमुख BJP
73 हजार 321 मिळाली

विजयी आघाडी : 48 हजार 824

Final Quota :
1 लाख 14 हजार 137

चंद्रकांत पाटलांना धक्का

पदवीधर निवडणुकीचा हा निकाल म्हणजे भाजपला जसा धक्का आहे, त्यापेक्षा अधिक धक्का चंद्रकांत पाटलांना आहे. कारण ज्या पुणे पदवीधर मतदारसंघात भाजपचा किंबहुना चंद्रकांत पाटलांचा दबदबा होता, तिथेच भाजपचा उमेदवार मोठ्या फरकारने पराभूत झाला. महत्त्वाचं म्हणजे चंद्रकांत पाटील यांनी 12 वर्षे म्हणजे दोन टर्म पुणे पदवीधर मतदारसंघाचं नेतृत्त्व केलं होतं, तिथेच भाजपचे अधिकृत उमेदवार संग्राम देशमुख यांचा पराभव होणं, हा भाजपपेक्षा चंद्रकांत पाटलांसाठी सेटबॅक आहे.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *