Pckhabar- फायजरची लस 95 टक्के प्रभावी असल्याचे तिसर्या टप्प्यातील चाचणीत समोर आले होते. ब्रिटनने या लसीला मंजुरी दिली असून, पुढील आठवड्यापासून लस उपलब्ध होणार असल्याची माहिती आहे. कोरोना लसीला मंजुरी देणारा ब्रिटन हा पहिला देश असल्याचे ब्रिटनच्या आरोग्यमंत्र्यांनी म्हटले आहे.
फायजर कंपनी ही कोरोना प्रतिबंधक लस जर्मन कंपनी बायोएनटेकसोबत संयुक्तरीत्या विकसित केली आहे. ही कोरोनाच्या विषाणूंचा खात्मा करणार असल्याचा दावा करण्यात आला आहे. फायजरच्या लस चाचणीचा संपूर्ण डेटा येत्या काही दिवसांत उपलब्ध होण्याची शक्यता आहे.
ब्रिटनमध्ये येत्या काही दिवसात 10 दशलक्ष लस उपलब्ध होणार असल्याचे वृत्त बीबीसीने दिले आहे. ही लस शरीरात प्रोटीन निर्माण करते, त्यातून प्रोटेटिव्ह अॅण्टीबॉडी तयार होते. त्यामुळेच डीप-फ्रीज उत्पादन, स्टोरेज आणि ट्रान्सपोर्टेशन नेटवर्कची अधिक आवश्यकता आहे. जेणेकरून लस अधिक वेळ टिकू शकते. लस वितरणातील अडचणींवर मात करणार असल्याचे ब्रिटनच्या आरोग्य मंत्र्यांनी सांगितले आहे.










Leave a Reply