Pimpri news : पीएमपीएमएल च्या पाच रूपयांत अटल प्रवासाला उदंड प्रतिसाद

Pimpri news : पीएमपीएमएल च्या पाच रूपयांत अटल प्रवासाला उदंड प्रतिसाद
Pckhabar-पुणे महानगर परिवहन महामंडळ लि. कडून सुरू करण्यात आलेल्या पाच किलोमिटर साठी पाच रूपयांत प्रवास या अटल बससेवेला प्रवाशांचा प्रतिसाद मिळत आहे. योजनेअंतर्गत पिंपरी-चिंचवड शहरामध्ये 33 बस शहरातील 16 मार्गांवर धावत आहेत. तसेच शहरात सहा वर्तुळ मार्गही पीएमपीएमएल ने सुरू केले आहेत. 25 ऑक्टोंबर पासुन ही योजना सुरू केली आहे.
पाच किलोमिटरसाठी पाच रूपयांत प्रवासाचे मार्ग- पिंपरीरोड ते पवारवस्ती, चिखली, पिंपरीरोड ते काळेवाडी चौक, पिंपरीगांव ते चिंचवडगांव, चऱ्होलीगांव ते आळंदी, भोसरी ते दिघी, भोसरी ते आरटीओ, संतनगर ते भोसरी, देहूरोड ते देहूगांव, चिंचवड स्टेशन ते डांगेचौक, निगडी ते रूपीनगर.
वर्तुळ मार्ग पुढील प्रमाणे-
1-पिंपरीरोड ते पिंपरीरोड- एच ए, वल्लभनगर, संत तुकारामनगर, वायसीएम, मासुळकर कॉलनी, मोरवाडी,
2-पिंपरीरोड ते पिंपरीरोड- मोरवाडी, मासुळकर कॉलनी, वायसीएम संततुकाराम नगर, वल्लभनगर, एच ए,
3-चिंचवडगांव ते चिंचवडगांव- केशवनगर, तापकीरनगर, काळेवाडी चौक, वाकड चौक, डांगेचौक.
4-चिंचवडगांव ते चिंचवडगांव- डांगेचौक, वाकडचौक, काळेवाडीचौक, तापकीरनगर, केशवनगर.
5- आकुर्डी स्टेशन ते आकुर्डी स्टेशन- संभाजीनगर, बिजलीनगर, वाल्हेकरवाडी, डी वाय पाटील कॉलेज.
पिंपरीरोड वर्तुळ मार्ग- पिंपरीरोड- एच.ए.कंपनी, वल्लभनगर एस.टी. स्टँन्ड, संततुकारामनगर, वायसीएम हॉस्पिटल, नेहरूनगर, मासुळकर कॉलनी, अजमेरा कॉलनी, मोरवाडी, पिंपरीरोड उलट याच दिशेने जाणारी दुसरी बस पाच रूपयांत थेट सेवा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *