Dehu news : देहूगावात आजपासून कुष्ठ, क्षय रुग्ण शोध अभियान; डॉ. किशोर यादव यांची माहिती
Pckhabar- देहूगाव परिसरात आज 1 ते 16 डिसेंबर 2020 दरम्यान कुष्ठ रुग्ण व क्षय रुग्ण शोध अभियान राबविण्यात येणार आहे. या मोहिमेअंतर्गत सर्वेक्षणाकरिता येणार्या कर्मचारी, स्वयंसेवकांना सहकार्य करण्याचे आवाहन देहूगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे मुख्य वैद्यकीय अधिकारी तथा नेत्ररोग तज्ञ डॉ. किशोर यादव यांनी केले आहे.
राज्यातील कोरोनाच्या आपत्कालीन परिस्थितीमुळे कुष्ठरुगण व क्षय रुग्णांचे निदान आणि औषधोपचाराखाली आणण्याचे प्रमाण कमी झाले आहे. मागील अनेक वर्षांच्या तुलनेत हे प्रमाण अत्यंत कमी आहे. याबाबत आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाकडून रुग्णांच्या लवकर निदानासाठी विविध उपाययोजना सुचविल्या जात आहेत.
रोगशास्त्रीय अभ्यासानुसार दोन्ही आजारांचे रुग्ण निदान व औषधोपचारापासून वंचित राहिल्यास रुग्णाला या रोगांपासून निर्माण होणार्या गुंतागुंतीचा सामना करावा लागतो. त्याचप्रमाणे त्याच्या सहवासातील इतर निरोगी लोकांना रोगाची लागण होण्याचा धोका संभवतो. संसर्गाची साखळी अखंडीत राहते.
समाजातील सर्व क्षयरुग्ण व कुष्ठरुग्णांचा शोध घेवून निदान निश्चितीनंतर औषधोपचार सुरु करणे अत्यंत महत्वाचे आहे. समाजातील कुष्ठरुग्ण व क्षयरुग्ण कमीत कमी कालावधीत शोधण्यासाठी महाराष्ट्र सरकारच्या निर्णयानुसार 1 ते 16 डिसेंबर दरम्यान शोध अभियान राबविण्यात येणार आहे.
देहूगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे मुख्य वैद्यकीय अधिकारी तथा नेत्ररोग तज्ञ डॉ. किशोर यादव,डॉ. रणजित कांबळे यांनी आशा कार्यकर्ती व मोहिमेअंतर्गत नियुक्त स्वयंसेवकांना प्रशिक्षण दिले.
बातम्या वाचण्यासाठी खालील फेसबुक लिंकवर क्लिक करून लाईक आणि शेअर करा.
https://www.facebook.com/PC-Khabar-111917450609892/
(ताजे अपडेट मिळविण्यासाठी Bel Icon वर Click करा.)












Leave a Reply