Chikhali Crime news : पेस्ट कंट्रोल करायला आला अन् हात साफ करून गेला

Chikhali Crime news : पेस्ट कंट्रोल करायला आला अन् हात साफ करून गेला
Pckhabar- पेस्ट कंट्रोल करायला आलेल्या एकाने घरातील ड्राव्हरमध्ये ठेवलेले सव्वा तीन लाखांचे सोन्याचे दागिने चोरून नेले. हा प्रकार चिंचवड येथील पुर्णानगर येथे घडला.
याबाबत अपर्णा प्रवनेश त्रिपाटी (वय-42, रा. पुर्णानगर, चिंचवड) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पेस्ट कंट्रोल करण्यासाठी आलेल्या विनोद चव्हाण या संशियत आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या घरात पेस्ट कंट्रोल करायचे होते. त्यासाठी आरोपी त्यांच्या घरी आला होता. संशियत आरोपीने ड्रेसिंग टेबलच्या ड्राव्हरमध्ये ठेवलेले सव्वा तीन लाखांचे 6.5 तोळे वजनाचे सोन्याचे दागिने चोरून नेले. सहायक पोलिस निरीक्षक ठाकूर तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *